IMPIMP

Rashmi Uddhav Thackeray | रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल

by nagesh
Rashmi Uddhav Thackeray | this is an insult to the national flag a complaint against rashmi thackeray to the lokayukta

सरकारसत्ता ऑनलाइन – वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ध्वजारोहण (Flag Hoisting) झाले. यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) यादेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाले होते. त्या फोटोमध्ये रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा (National flag) अवमान झाल्याचे दिसत असल्याच्या कारणावरून अ‍ॅड जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी लोकायुक्तांकडे (Lokayukta) तक्रार दाखल केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रकृती अस्वस्थतेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातूनच कामकाज करत होते. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान बऱ्याच दिवसानंतर ते प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. ध्वजारोहण कार्यक्रमाला (Flag Hoisting Program) पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty), मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे (Vikas Kharge) आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्षा या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
त्या फोटोत मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री तिरंग्याला सलामी देताना दिसत आहेत, मात्र रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) या सलामी देताना दिसून येत नाहीत. त्यावरून रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची तक्रार आयुक्तांकडे दिली आहे.
त्याचबरोबर शिष्टाचाराचा भंग करुन मुख्यमंत्र्यांसमेवत रेड कार्पेटवर आदित्य ठाकरेंनाही उभे करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जयश्री पाटील यांच्या तक्रारीत काय म्हटलंय?

वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोक्यावर गांधी टोपी न घालता राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
पण याबद्दल माझा काही आक्षेप नाही. कोणी एम. के. गांधी (M. K. Gandhi) यांच्या विचारांचे तर कोणी श्रीमान नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्या विचाराला मान्यता देऊ शकतात.तो त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.
परंतु, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणारे रेड कार्पेटवर (Red Carpet) उपस्थित असतात.
तेथे उपस्थितांनी न विसरता सलामी द्यायची असते.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कार्पेटवर असून ध्वजारोहणानंतर सलामी देत नाहीत, हे कशाचं लक्षण आहे.

त्यांना ध्वज संहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का? ध्वजसंहितेचा अपमान हा भारतीय नागरिकांच्या भावनांचा सार्वजनिकरित्या अपमान केल्यासारखं आहे.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रगीताचा (National Anthem) अपमान प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा (FIR) नोंदवावा अशी मागणी केली आहे.

Web Title : Rashmi Uddhav Thackeray | this is an insult to the national flag a complaint against rashmi thackeray to the lokayukta

हे देखील वाचा :

Sara Ali Khan Viral Video | मेकअप करताना व्हॅनिटीमधील बल्ब फुटला सारा अली खानच्या चेहऱ्याजवळ, व्हिडिओ झाला व्हायरल..

Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मी फार छोटा माणूस..’

Anil Awachat | ‘मुक्तांगण’चा आधारवड हरपला ! अवलिया डॉ. अनिल अवचट यांचे निधन

Dilip Walse Patil | दिलीप वळसे पाटलांचे पोलिसांना आवाहन, म्हणाले – ‘महिलांची सुरक्षा ही आपली जबाबदारी’

Related Posts