IMPIMP

RBI FD Rules Changed | आरबीआयने एफडीचे बदलले नियम ! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

by nagesh
RBI FD Rules Changed | fd new rules rbi changed the rules regarding fixed deposits you should know see details

सरकारसत्ता ऑनलाइन – RBI FD Rules Changed | तुम्हीही मुदत ठेवींमध्ये पैसे ठेवले तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आरबीआय (RBI) ने एफडीशी संबंधित नियम बदलले आहेत. नवीन नियमही लागू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे एफडी घेण्यापूर्वी थोडा माहिती घ्या. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते (RBI FD Rules Changed).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

FD च्या मॅच्युरिटीचे नियम बदलले
वास्तविक, आरबीआयने फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit (FD) च्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे की आता मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर, जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. हे व्याज बचत खात्यावर मिळणार्‍या व्याजाइतके असेल.

 

सध्या, बँका सामान्यतः 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीच्या FD वर 5% पेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावरील व्याजदर सुमारे 3 ते 4 टक्के आहेत.

 

RBI ने जारी केला हा आदेश
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर एफडी मॅच्युअर झाली आणि रक्कम दिली गेली नाही किंवा दावा केला गेला नाही, तर बचत खात्यानुसार त्यावर व्याजदर किंवा मॅच्युरिटी झालेल्या एफडीवर ठरलेला व्याजदर, यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. सर्व कमर्शिअल बँका, स्मॉल फायनान्स बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू होतील. (RBI FD Rules Changed)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नियम काय म्हणतात ते जाणून घ्या
समजा तुमच्याकडे 5 वर्षांची मॅच्युरिटी असलेली एफडी आहे, जी आज मॅच्युअर झाली, परंतु तुम्ही हे पैसे काढले नाही, तर यावर दोन स्थिती असतील. जर एफडीवर मिळणारे व्याज त्या बँकेच्या बचत खात्यावरील व्याजापेक्षा कमी असेल तर तुम्हाला एफडीचे व्याज मिळत राहील.

 

जर एफडीवर मिळणारे व्याज बचत खात्यावर मिळणार्‍या व्याजापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर बचत खात्याचे व्याज मिळेल.

 

हा होता जुना नियम
याआधी, एफडी मॅच्युअर झाली आणि तुम्ही ती काढली नाही किंवा दावा केला नाही,
तर बँक तुमच्या एफडीचा कालावधी पूर्वी इतकाच वाढवत असे. पण आता ते होणार नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पण आता एफडीचे पैसे मॅच्युरिटीनंतर काढले नाहीत तर त्यावर एफडीचे व्याज मिळणार नाही.
त्यामुळे मॅच्युरिटीनंतर लगेच पैसे काढणे योग्य ठरेल.

 

Web Title :- RBI FD Rules Changed | fd new rules rbi changed the rules regarding fixed deposits you should know see details

 

हे देखील वाचा :

Assembly Election results 2022 | काँग्रेसच्या पराभवानंतर शरद पवारांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण, दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले …

UP Election Result 2022 | उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता, पण ओवैसींच्या AIMIM चं काय झालं? जाणून घ्या

Goa Assembly Result | गोव्यात भाजपचा विजय ! फडणवीसांनी विजयाचे श्रेय दिले ‘या’ दोन व्यक्तींना, स्वत:चं नाव नाही घेतलं

 

Related Posts