IMPIMP

Red Meat Health Risk | लाल मांस जास्त खाणार्‍यांमध्ये या गंभीर आजारांचा धोका जास्त; जाणून घ्या

by nagesh
Red Meat Health Risk | red meat health risk red meat cause cancer and heart disease

सरकारसत्ताऑनलाइन – Red Meat Health Risk | आरोग्य उत्तम राहावं यासाठी आहारात विविध प्रकारच्या प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्सयुक्त पदार्थ (Protein, Vitamins, Minerals And Antioxidants Rich Food) समाविष्ट करायला हवी. पौष्टिक आहाराचा विचार करताच लोकांच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे मांस. मांसाहारामुळे प्रथिने आणि जीवनसत्वे खुप मिळतात. पण सावधान… विशेषत: लाल मांसाच्या अतिसेवनाने काही आजार उद्भवू शकतात (Red Meat Health Risk).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लाल मांसामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्याचे सेवन केल्याने शरीरात अनेक पोषक द्रव्यांचा (Nutrients) सहज पुरवठा होतो. पालेभाज्या आणि फळे, कडधान्ये (Leafy Vegetables, Fruits And Cereals) यातून जे जीवनसत्व मिळतात. तेवढी एकट्या मासाहारातून प्राप्त होतात. परंतु जास्त लाल मांस खाण्याची सवय देखील आपल्या अडचणी वाढवू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक लाल मांसाचे जास्त सेवन करतात त्यांना अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका वाढतो, अशा परिस्थितीत लाल मासाचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे (Red Meat Health Risk).

 

हृदयरोगाचा धोका (Risk Of Heart Disease) –
आरोग्यतज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, जे लोक जास्त लाल मांसाचे सेवन करतात त्यांना हृदयरोगाचा धोका वाढला आहे. लाल आणि प्रक्रिया केलेल्या मांसाचे सेवन हृदयरोग आणि स्ट्रोकच्या (Stroke) वाढीव धोक्याला निमंत्रित करतात. संशोधकांना असे आढळले की, लाल मांसाचे जास्त सेवन करणार्‍या लोकांमध्ये आतडे बॅक्टेरिया कमी होतात. या व्यतिरिक्त, अशा लोकांमध्ये रक्त गोठण्याचा आणि रक्तपुरवठ्यात अडथळा येण्याचा धोका वाढतो. यामुळे हृदयरोगाचे प्रमुख कारण ठरतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लाल मांसामुळे कर्करोगाचा धोका (Risk Of Cancer Due To Red Meat) –
लाल मांसामुळे गुदाशय, प्रोस्टेट आणि स्वादुपिंडाच्या कर्करोग (Rectum, Prostate And Pancreatic Cancer) होऊ शकतो. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी, लोकांनी लाल मांसाऐवजी कोंबडी आणि वनस्पती-आधारित पदार्थांचे अधिक सेवन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला काही तज्ज्ञांच्या अभ्यास अहवालाद्वारे देण्यात आला आहे.

 

मधुमेहींसाठी धोक्याची घंटा (Harmful For Diabetic Patients) –
लाल मांसाचे वारंवार सेवन करण्याच्या सवयीमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. २०२० च्या एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की दररोज फक्त ५० ग्रॅम लाल मांस खाल्ल्याने मधुमेहाचा धोका ११ टक्क्यांनी वाढू शकतो. याव्यतिरिक्त, मधुमेह असलेल्या लोकांना प्रक्रिया केलेल्या मांसाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. लाल मांस रक्तातील साखरेच्या पातळीवर (Blood Sugar Level) परिणाम करू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

लाल मांसाचे सेवन कमी करा (Reduce Intake Of Red Meat) –
Red Meat आणि प्राण्यांवर आधारित पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे, काही लोकांना अल्फा-गॅल सिंड्रोम (Alpha-Gal Syndrome) नावाची अ‍ॅलर्जीची समस्या उद्भवू शकते.
या अ‍ॅलर्जीचे वर्णन काही परिस्थितींमध्ये प्राणघातक म्हणून देखील केले गेले आहे.
आरोग्य तज्ञांच्या मते, लाल मांस खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील तर ते टाळायला हवं.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Red Meat Health Risk | red meat health risk red meat cause cancer and heart disease

 

हे देखील वाचा :

PMC Medical College Pune | पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात 78 प्रवेश, उर्वरित जागांसाठी विशेष फेरी

Modi Government | छोट्या उद्योगांसाठी मोठा दिलासा ! मोदी सरकारने नवीन योजना RAMP साठी 6062 कोटींची मंजूरी दिली, जाणून घ्या 10 मुद्द्यांमध्ये सविस्तर

Skin Cancer Symptoms | तुमचे डोळेही देतात कॅन्सरचे संकेत, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या

 

Related Posts