IMPIMP

Gold Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किती झाला 10 ग्रॅम सोन्याचा दर ?

by nagesh
 Gold-Silver Rate Today | gold rate today is on 26th january 2023 gold and silver rate hike today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव चढे असताना चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वायदा भाव (Gold Rate) आज 573 रुपयांनी घसरून 52,012 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याआधी सोन्याचा व्यवहार 52,265 रुपयांच्या पातळीवर सुरू होता, मात्र मागणीअभावी लवकरच भाव खाली आले. (Gold Price Today)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज मंगळवारी चांदीमध्येही मोठी घसरण दिसून येत आहे. काही वेळापूर्वी एमसीएक्सवर चांदीचा भाव 1,324 रुपयांनी घसरून 57,952 रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीची ट्रेडिंगची सुरूवात 58,501 रुपयांच्या पातळीवर सुरू झाली. पण काही वेळानंतर तिच्यात मागील बंद किंमतीपेक्षा 2.23 टक्के घसरण झाली. (Gold Price Today)

 

ग्लोबल मार्केटमध्ये तेजी

ग्लोबल मार्केटमध्ये आज सोने हिरव्या निशाणीत व्यवहार करत असले तरी चांदीच्या दरात घसरण झाली आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याचा हाजीर भाव 1,781.27 प्रति औंस होता, जो त्याच्या मागील बंद भावापेक्षा 0.16 टक्के जास्त आहे. चांदीचा हाजीर भाव आज घसरून 20.02 प्रति औंस झाला. मागील बंद भावाच्या तुलनेत तो 0.22 टक्के कमी आहे.

 

पुढे काय होणार ?

ग्लोबल मार्केटमधील सोन्याच्या किमतीवर अमेरिकन बाजाराचा लक्षणीय परिणाम होतो.
यूएसमध्ये, जुलैमधील महागाईची आकडेवारी दिलासा देणारी होती, त्यामुळे गुंतवणूकदार भविष्यात सोने खरेदी करतील अशी शक्यता आहे.
कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया सांगतात की, वर्षअखेरीस सोन्याचा भाव 54 हजारांच्या पुढे जाईल,
पण भू-राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव 48 हजारांपर्यंत घसरेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : – Gold Price Today | gold price silver rate latest gold rate today 16 august

 

हे देखील वाचा :

Aadhaar Seva At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवर आधार सेवा केंद्र; रेल्वे स्टेशनवर आधार कार्डबरोबर दुरुस्तीही करता येणार

White Hair Problem Solution | कमी वयात डोक्याचे केस का होतात पांढरे? जाणून घ्या कसा करावा बचाव

Vinayak Mete Death | विनायक मेटे अपघात प्रकरणाला नवे वळण, 2 गाड्यांनी पाठलाग केला होता

 

Related Posts