IMPIMP

Rita India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या सौजन्याने ‘महिलांचे आरोग्य आणि जागरूकता’ याविषयावरील कार्यशाळा संपन्न

by nagesh
 Rita India Foundation | Workshop on 'Women's Health and Awareness' held courtesy of Rita India Foundation

सरकारसत्ता ऑनलाईन – Rita India Foundation | आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत रिता इंडिया फाऊंडेशन च्या सौजन्याने आयडेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हिंजेवाडी (Adient India Private Limited) या कंपनितील २० महिला कर्मचारी वर्गासाठी महिलांचे आरोग्य आणि जागरूकता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली . (Rita India Foundation)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ह्या कार्यशाळेत आरोग्याचे स्वाट विश्लेषण आणि पाळी, पाळीतील समस्या उपचार आणि काळजी या विषयावर रिता इंडिया फाऊंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया (Dr. Rita Shetiya) आणि श्वेता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. (Rita India Foundation)

या कार्यशाळेत भाग घेतलेल्या महिलांनी याला उस्फुर्त प्रतिसाद देत , त्यांच्या समस्या आणि याविषयावरील मते परखडपणे व्यक्त केली.

हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी आयडेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्लांट एच आर ऑफिसर अविनाश तुपे , एच आर मॅनेजर सतीश कुलकर्णी आणि असिस्टंट मॅनेजर उदय ओक आणि आयडेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील इतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

रिता इंडिया फाउंडेशन च्या विश्वस्त संस्थापिका एच . सी . डॉ. सविता शेटीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी कार्यशाळेत भाग घेलेल्या अरुणा राठोड म्हणाल्या , या कार्यशाळेमुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. पाळी का येते ते आपल्ये आरोग्य निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात काय करायला हवे , हे आम्हाला समजले. आम्ही नक्कीच जे सांगितले आहे ते करू.

कल्पना जाधव म्हणाल्या , आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण काम आणि काम याकडेच लक्ष देतो , आरोग्याकडे नाही. आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही काम चांगल्या प्रकारे करू शकतात . तेच आम्ही स्वतःसाठी नक्की करू दिवसातील १ तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देऊ .

 

आयडेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे प्लांट एच आर ऑफिसर अविनाश तुपे म्हणाले ,
या कार्यशाळेचा लाभ नक्कीच आमच्या कर्मचारी वर्गाला होईल आणि त्या जे सांगितले आहे त्यावर
अंबलबजावणी करतील. महिला दिनी हा विषय ठेवण्याचे हेच कारण होते कि आमच्या महिला कर्मचारी
वर्गाला आरोग्याचे स्वाट विश्लेषण आणि पाळी याविषयी जागृती व्हावी,

कंपनी तर्फे या सर्व महिलांचे स्वागत आणि सन्मान आणि केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rita India Foundation | Workshop on ‘Women’s Health and Awareness’ held courtesy of Rita India Foundation

 

हे देखील वाचा :

To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

Sayaji Shinde | अभिनेते सयाजी शिंदेवर पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडाचे पुनर्रोपण करत असताना मधमाशांकडून हल्ला

Pune Crime News | रंगपंचमी खेळताना वादातून तरुणावर कोयत्याने केले वार; धनकवडीतील बालाजीनगरमधील घटना

 

Related Posts