IMPIMP

RMD Foundation-Pune News | आर. एम. डी. फाउंडेशनच्या वतीने रविवारी ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’च्या सामूहिक पठणाचे आयोजन

by sachinsitapure
Shobha Rasiklal Dhariwal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – RMD Foundation-Pune News | जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या ‘श्री उवसग्गहरं स्तोत्रा’च्या सामुहिक पठणाचा कार्यक्रम रविवारी (दि.10) आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक भवन यश लॉन्स, बिबवेवाडी पुणे येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. स्त्रोत्राच्या कार्यक्रमाला लहान -थोर, जैन अजैन या सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आर. एम. डी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) व उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारिवाल (Shobha Rasiklal Dhariwal) यांनी केले आहे. (RMD Foundation-Pune News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या ‘श्री उवसग्गहरं स्तोत्रा’च्या सामुहिक पठणाचा प्रथम कार्यक्रम 2017 मध्ये दानशूर आदरणीय रसिकलालजी धारिवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. तसेच 2018 मध्ये भारतगौरव, शांतीदुत जैन दिगंबरमुनी, आचार्य पुलकसागरजी महाराज यांच्या मंगल सान्निध्यात दहा हजार जैन अजैन भाविकांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला होता. तर 2019 मध्ये जैन आचार्य सम्राट डॉ . शिवमुनीजी म. सा. यांच्या उपस्थितीत पंधरा हजार जैन अजैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. 2020 मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता यू ट्यूब द्वारे पू. रमणीक मुनिजी तर 2021 मध्ये पू. तारक ऋषीजी यांच्या उपस्थितीत हजारो लोकांनी घरी राहूनच ऑनलाईन उवसग्गहरं स्त्रोत्राचा लाभ घेतला होता. 2022 मध्ये उपप्रवर्तिनी महासती सुमित्राजी म. सा. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. (RMD Foundation-Pune News)

‘श्री उवसग्गहरं स्तोत्रा’च्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह, रोगपिडा, शत्रु आदी सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रांमध्ये सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे.

यावर्षीचे हे सातवे वर्ष असून डॉ. साध्वी कुमुदलताजी म. सा. आदिठाणा -4 यांच्या उपस्थितीत ‘उवसग्गहरं स्तोत्र’
संगीतमय सामूहिक पठणाचे भव्य आयोजन आर.एम.धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन व
उपाध्यक्ष शोभा रसिकलाल धारिवाल यांच्याद्वारे रविवारी (दि. 10) सायंकाळी 4 ते 5 या वेळेत,
श्रीमान रसिकलाल एम धारीवाल स्थानक भवन यश लॉन्स, बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
कार्यक्रम ठीक 4 वाजता सुरु होईल. दिलेल्या नियोजित वेळेत लहान -थोर, जैन अजैन या सर्वांनी या महामंगलकारी स्त्रोत्रात सहभागी व्हावे.
सहभागी होणाऱ्या पुरुषांनी सफेद तर महिलांनी केशरी वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे
अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन व उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारिवाल यांनी दिली आहे.

Related Posts