IMPIMP

Pune Crime News | फुरसुंगी: पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुबाडले ! कार, मोटारसायकलवरुन आलेल्या 12 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल, गुन्हे शाखेकडे तपास

by sachinsitapure
Fursungi Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मोटारसायकलवरुन जाणार्‍या तरुणाला अडवून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोकड, पॅनकार्ड, आधार कार्ड जबरदस्तीने चोरुन नेल्याचा (Robbery In Pune) प्रकार समोर आला आहे. कार व मोटारसायकलवरुन आलेल्या १२ जणांनी हा दरोडा (Dacoity) घातला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

फुरसुंगी (Fursungi) येथील चंदवाडी कॅनॉल रोडवर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. याबाबत साईनाथ अंकुश शेडगे (वय २५, रा. कर्वेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३४५/२३) दिली आहे. त्यानुसार कारमधून आलेले ५ ते ६ व मोटार सायकलवरुन आलेले ६ अशा १२ जणांवर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोटारसायकलवरुन चंदवाडी कॅनॉल रोडवरुन जात होते.
त्यावेळी स्विफ्ट कार व मोटारसायकलवरुन काही जण आले. त्यांनी फिर्यादी याला थांबवून त्यांना पिस्तुलाचा धाक
दाखवत मारहाण केली. शिवीगाळ करुन त्यांच्या पँटच्या खिशातील पाकिटामधील ५ हजार ५०० रुपये, पॅनकार्ड
व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. अगर किसी को कुछ बताया, या पोलिस मे कम्प्लेंट किया, तो तुझे खतम करेंगे,
अशी धमकी दिली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस उपनिरीक्षक पाटोळे (PSI Patole) तपास करीत आहेत.

Related Posts