IMPIMP

Rohit Pawar | “दाभोलकरांच्या साताऱ्यात…” रोहीत पवारांचा बावनकुळेंवर हल्ला

by nagesh
Rohit Pawar | rohit pawar slams bjp over kasba bypoll election candidacy

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – भारतीय जनता (BJP) पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी, ‘शरद पवारांनी (Sharad Pawar) अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांच्यावर जादूटोणा केलाय’ असे विधान केले होते. आता या विधानाविरोधात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चंद्रकांत बावळकुळेंचे विधान कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे. साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शरद पवारांनी जादूटोणा केल्याने उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेससह गेले, असे बावनकुळेंनी म्हटले. बावनकुळेंच्या या टीकेवरुन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कठोर शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रोहित पवार यांनी नरेंद्र दाभोलकरांचा (Narendra Dabholkar) फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्वीटरवरुन (Twitter) बावनकुळेंच्या पत्रकार परिषदेतील फोटो आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकरांचा फोटो एकत्र टाकत ते म्हणतात, ‘अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला त्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या साताऱ्यात भाजपा प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्यालाच हे आव्हान आहे.’

 

ते पुढे लिहितात,’आता याबाबत राज्य सरकार काय करतं याकडं सर्वांचं लक्ष लागलंय! राज्यातले प्रकल्प गुजरातला
नेऊन प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्राला मागं आणण्याचा प्रयत्न तर भाजपकडून सातत्याने होतच आहे,
पण विचारांच्या बाबतीतही महाराष्ट्राला मागं आणण्याचा त्यांचा डाव स्पष्ट दिसतोय.’ असा आरोप रोहित पवार
(Rohit Pawar) यांनी केला आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळेंनी शरद पवार यांना भोंदूबाबा म्हणून
त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार बनलं असे वक्तव्य केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Pawar | chandrashekhar bawankule comment about ncp sharad pawar doing magic on uddhav thackeray rohit pawar slams bjp state chief

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मी पळून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – अजित पवार

Jitendra Awhad | अटकेच्या कारवाईवर जितेंद्र आव्हाड म्हणाले-‘फाशी दिली तरी चालेल, गुन्हा..’

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांची अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया, म्हणाले- “अजित पवार काय करतील याचा नेम नाही…”

 

Related Posts