IMPIMP

Rohit Pawar | पवार कुटुंबात देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव, आ. रोहीत पवारांचा मोठा दावा

by nagesh
Rohit Pawar | ncp rohit pawar alleged opponents could target us after shivsena

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  जून महिन्यात शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीत (NCP) देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. ज्याप्रकारे शिवसेना फुटून दोन गट तयार झाले, त्याचप्रमाणे पवार कुटुंबात देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असे रोहीत पवार (Rohit Pawar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी हा दावा केला. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष केले जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. परंतु पवार कुटुंबात (Pawar Family) कोणतेही हेवेदावे नसून सर्वांचे उद्दीष्ट स्पष्ट असल्याचे देखील पवार म्हणाले.

 

अजित पवार आणि रोहीत पवार यांच्या नात्यात दुरावा आहे का, असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, अजित पवारांनीच (Ajit Pawar) मला जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि विधानसभेचे (Vidhan Sabha) तिकीट दिले. माझे लग्न देखील त्यांनीच ठरविले होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्हाला मोठे व्हायचे असते, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही. आम्हा सर्वांची उद्दीष्टे स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत, अजित पवारांनी राज्यात आणि मला सध्या जे करतोय ते काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांना शिवसेनेप्रमाणे आमच्या कुटुंबात दोन गट पाडायचे आहेत. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल, तर राष्ट्रवादी फुटेल, असे विरोधकांना वाटत आहे.

 

रोहीत पवार यांच्या या दाव्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील प्रतिक्रिया दिली आहे.
रोहीतला या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे, ते विचारतो.
भाजप (BJP), शिवसेना, काँग्रेस (Congress), मनसे (MNS) आणि राष्ट्रवादी (NCP) या प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे.
प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावे. अलीकडच्या काळात वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
मला काही दिवसांपूर्वी हे सरकार किती दिवस टिकणार, असा प्रश्न विचारला होता.
त्यावर मी 145 आकडा आहे, तोपर्यंत टिकणार आहे, असे म्हंटले होते.
पण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला, असे अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Pawar | ncp rohit pawar alleged opponents could target us after shivsena

 

हे देखील वाचा :

Andhari by-Election | दिवाळीच्या तोंडावर चांगले वातावरण…कशाला उगाच…, भाजपाने माघार घेतल्याने टीका करणार्‍यांना अजित पवारांनी सुनावलं

MP Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच; सुनावणी पुढे ढकलली

CM Eknath Shinde | एकदम ओके! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी एकाच फ्लेक्सवर

 

Related Posts