IMPIMP

MP Sanjay Raut | संजय राऊत यांना जामीन नाहीच; सुनावणी पुढे ढकलली

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन गोरेगाव येथील कथित पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणात (Patrachal Land Scam) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या (Enforcement Directorate) म्हणजे ईडीच्या कोठडीत (ED Custody) आहेत. त्यांनी न्यायालयात जामीनासाठी याचिका (Bail Application) दाखल केली होती. पण न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणीस पुढील तारीख दिली. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज (दि. 18) सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 21 ऑक्टोबर तारीख दिली आहे. राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) कोठडीत आहेत. राऊत यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. यावेळी त्यांची जामीन अर्जावरील आणि नियमित सुनावणी एकाच वेळी सुरु झाली.

 

ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह (Solicitor General Anil Singh) यांनी युक्तीवाद केला. तर राऊत यांच्या वतीने अशोक मुंदरगी (Ashok Mundargi) यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने उभय पक्षांची मते ऐकून घेत जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे यंदाची दिवाळी (Diwali) राऊत यांना तुरुंगातच काढावी लागणार आहे.

 

संजय राऊत यांचे बंधू प्रवीण राऊत (Pravin Raut) यांनी पत्राचाळीतील भूखंडाचा काही भाग खासगी विकासकांना विकला असून त्यांनी रहिवाश्यांची फसवणूक (Fraud) केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रवीण राऊत यांची गुरु आशिष नावाची बांधकाम कंपनी आहे. या गैरव्यवहारात कोट्यवधींचा अपहार झाला आहे.
त्यातील काही रक्कम प्रवीण राऊत यांनी आपल्या नातेवाईकांच्या खात्यावर टाकली होती.
त्यात संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या खात्यावर देखील 55 लाख रुपये आले होते.
त्यामुळे राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्यावर पीएमएलए  PMLA (Prevention of Money Laundering Act) कायद्यान्वये याचिका दाखल केली गेली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut has not been granted bail in the patrachwal case

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | एकदम ओके! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी एकाच फ्लेक्सवर

State Government Employees | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीपूर्वीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार

Eknath Khadse | अखेर जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहार प्रकरणाचा गुन्हा दाखल; एकनाथ खडसेंचे पोलिसांवर मोठे आरोप

Ajit Pawar | मंत्री अर्वाच्च भाषेत अधिकार्‍यांशी बोलतात, बाप काढतात, ही संस्कृती? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही का?, अजित पवारांचा परखड सवाल (व्हिडिओ)

 

Related Posts