IMPIMP

Rohit Pawar Vs Ram Shinde | कर्जत नगरपंचायत निवडणूक ! राष्ट्रवादीचा भाजपला झटका; रोहित पवारांचं वर्चस्व

by nagesh
 Rohit Pawar Vs Ram Shinde | karjat jamkhed nagar panchayat election result rohit pawar ncp wins setback for bjp leader ram shinde

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Rohit Pawar Vs Ram Shinde | राज्यातील 106 नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत.
महत्वाचा निकाल मानला जाणारा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीत (Karjat Jamkhed Nagar Panchayat Result)
भाजपला (BJP) जोरदार धक्का बसला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे निर्विवाद वर्चस्व निर्माण
झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती त्या ठिकाणी
भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता याठिकाणी राष्ट्रवादीनं आपली सत्ता मिळवली आहे .(Rohit Pawar Vs Ram Shinde)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचं पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व निर्माण झालं आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार एकणू 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला. तर, एका जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवर विजय संपादन केला आहे. त्याचबरोबर भाजपचे राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या 2 जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर, काँग्रेसलाही (Congress) 3 जागांवर विजय मिळाला आहे. (Rohit Pawar Vs Ram Shinde)

 

 

दरम्यान, कर्जतमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यात आमने सामने लढत होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठापणाला लागली होती. यामध्ये आता रोहित पवार यांनी आपली सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे (NCP) वर्चस्व राहिलं आहे.

 

 

Web Title :- Rohit Pawar Vs Ram Shinde | karjat jamkhed nagar panchayat election result rohit pawar ncp wins setback for bjp leader ram shinde

 

हे देखील वाचा :

Mystery Brain Disease | आणखी एका रहस्यमय आजाराची चाहूल, रूग्ण स्वत:वर ठेवू शकत नाही नियंत्रण; होऊ लागते विस्मरण

Ajit Pawar | ‘CM म्हणाले होते एकत्र लढू, पण…’, अजित पवारांनी सांगितलं नगरपंचायतींचे राजकारण

‘एकदम मोफत’ घ्यायचे असेल ‘रेशन’ तर घरबसल्या लिंक करा Aadhaar-Ration Card, मिळतील अनेक जबरदस्त फायदे

 

Related Posts