IMPIMP

Roshni Shinde | ‘गुंडगिरी करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?’, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

by nagesh
 Roshni Shinde | thackeray group roshani shinde on eknath shinde after attacks shinde group woman

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना सोमवारी (दि.3) मारहाण
(Beating) झाली होती. शिवसेनेच्या (Shivsena) महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे यांना
दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. यावर आता रोशनी
शिंदे (Roshni Shinde) यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोशनी शिंदे (Roshni Shinde) म्हणाल्या, ठाण्याचे मुख्यमंत्री झालात. मग गुंडगिरी करण्यासाठी ठाण्याचे मुख्यमंत्री झालात का? दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. प्रत्येक गोष्टीचा न्याय झाला पाहिजे. माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी बोलत नाही. कित्येक महिलांवर अन्याय होत आहे. किती दिवस शांत बसायचं. तुमच्या महिला त्या महिला, आमच्या महिला रस्त्यावरील आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित करत हे सर्व बंद करण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच पोलिसांनी (Thane Police) तातडीने कारवाई करावी अशी देखील मागणी रोशनी शिंदे यांनी केली आहे.

 

 

ठाकरे कुटुंब रोशनी शिंदेंची भेट घेणार

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आज ठाण्यात जाणार आहेत. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. रोशनी शिंदे यांना मारहाण (Roshni Shinde Beating Case) करण्यात आली होती. यामध्ये त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील उपस्थित राहणार आहेत.

 

 

पोलीस अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटात (Shinde Group) राडा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आनंदाश्रमामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तब्बल दोन तास ही बैठक सुरु होती. मुख्यमंत्र्यानी या प्रकरणाची सर्व माहिती घेतली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Roshni Shinde | thackeray group roshani shinde on eknath shinde after attacks shinde group woman

 

हे देखील वाचा :

Maharashtra Congress | काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!, नेत्याचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांकडून पटोलेंना महिन्याला एक खोका मिळतो’

Joshi’s Museum Of Miniature Railways | रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ‘वंदे भारत’ रेल्वेच्या प्रतिकृतीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावारण; लवकरच संग्रहालयात धावणार वंदे भारत रेल्वे (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण (व्हिडिओ)

 

Related Posts