IMPIMP

Maharashtra Politics News | ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra Politics News | uddhav thackeray group female leader allegedly beaten up by eknath shinde shivsena women officials

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Politics News | ठाण्यात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) आमने-सामने आले आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण (beating) केल्याची घटना घडली आहे. फेसबुकवर पोस्ट केल्याच्या रागातून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला (Maharashtra Politics News) मारहाण करण्यात आली. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा (FIR) दाखल केलेला नाही. यावरुन ठाण्याचे खासदार राजन विचारेंनी (MP Rajan Vichare) शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही घटना सोमवारी (दि.3) रात्री 8.30 च्या सुमारास घडली. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Group) युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी दीपक शिंदे (Roshni Deepak Shinde) यांना माराहण करण्यात आली. रोशनी शिंदे काम करत असलेल्या कंपनीत घुसून शिंदे गटाच्या जवळपास 15 महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत रोशनी शिंदे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात (Kasarvadvali Police Station) लेखी तक्रार दिली आहे.

 

 

या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना खासदार राजन विचारे म्हणाले, महाराष्ट्राने गेले नऊ महिने चाललेला हा तमाशा आणि अत्याचार पाहिला असेल. प्रत्येक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात (Maharashtra Politics News) येत आहेत. एका युवती सेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला शोरुममध्ये जात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ती महिला पदाधिकारी गर्भवती असूनही तिला मारहाण करण्यात आली.

 

राजन विचारे पुढे म्हणाले, तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता केवळ अर्ज दाखल करुन घेतला. रुग्णालयात तपासणीसाठी गेलो, तर त्याठिकाणी दाद देण्यात आली नाही. सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांना छळण्यासाठी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांचे विचार घेऊन पुढे चाललो, असं सागता. तर मग एखाद्या महिलेला चक्कर येईपर्यंत मारहाण करता, ही अमानुष घटना आहे. उद्या त्या मुलीला काही झाले, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल, असा इशारा राजन विचारे यांनी दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ठाकरे गटाचा पोलीस ठाण्यात ठिय्या

कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर शोरुममध्ये घुसून काही महिलांनी हल्ला केला.
या घटनेनंतर खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी
कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र, या घटनेला 12 तास उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | uddhav thackeray group female leader allegedly beaten up by eknath shinde shivsena women officials

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पैशासाठी केला पत्नीचा सौदा; ३ हजारांसाठी केले मित्रांच्या हवाली : पत्नीवर वेश्या व्यवसाय करण्यासाठी बळजबरी

Maharashtra Politics News | ‘रिक्षावाला घाम गळतो, कुठलाही व्यवसाय नसताना आदित्य ठाकरेंच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती’

Pune ACB Trap | पुरंदर : लाच प्रकरणी महिला तलाठयासह दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Pune Accident News | कचर्‍याच्या गाडीच्या धडकेने ३ वर्षाची चिमुरडी ठार

 

Related Posts