IMPIMP

Pune Police | पुणे शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

by nagesh
Pune Crime News | A policeman who attempted 'recovery' near 'Dagdusheth' on Sankashti Chaturthi has been suspended

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Police | विना परवानगी गैरहजर राहणाऱ्या पुणे पोलिसांच्या लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalabhor Police Station) कार्यरत असणारे पोलीस शिपाई प्रशांत मधुकर गायकवाड (Prashant Madhukar Gaikwad) यांना तडकाफडकी निलंबित (Pune Policeman Suspend) करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Unit 5 DCP Namrata Patil) यांनी काढले आहेत. (Pune Police)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रशांत गायकवाड हे जून 2021 पासून गैरहजर आहेत. त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडून वेळोवेळी कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र प्रशांत गायकवाड हे कामावर हजर झाले नाहीत. यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतरही गायकवाड हे कामावर हजर झाले नाहीत. गायकवाड त्यांचे गैरवर्तन पोलीस दलातील इतर कर्मचारी यांच्यावर होऊन पोलीस दलाच्या शिस्तीस बाधा निर्माण करणारे असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

 

प्रशांत गायकवाड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील (Maharashtra Civil Service Act) नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे. त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही. मुख्यालय सोडायचे असेल तर पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे यांना अगोदर माहिती देऊन त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निलंबन कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title: Pune Police | Police personnel of Pune city police force have been suspended

 

हे देखील वाचा :

Pune Collector On Helmet Compulsion | ‘पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही’; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचे स्पष्टीकरण

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 16 वर्षीय विद्यार्थ्यानं ट्युशन घेण्यासाठी घरी आलेल्या शिक्षीकेचा बाथरूममधील व्हिडीओ केला ‘रेकॉर्ड’

Pune Nana Peth Fire | नाना पेठेतील गोदामाला भीषण आग ! फायबरचा कारखाना, स्पेअर्स पार्ट, स्पंज, लाकडी सामानाचे गोदाम जळून खाक; अग्निशामक दलाच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 जखमी

 

Related Posts