IMPIMP

सचिन तेंडुलकरला हवीय इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूसारखी शरीरयष्टी

by pranjalishirish
sachin-tendulkar-ask-how-many-omelettes-would-i-need-eat-look-englands-chris-tremlett

सरकारसत्ता ऑनलाइन – आजकाल सगळ्यांना पिळदार शरीरयष्टी पाहिजे आहे. तसा सध्या ट्रेंडच सुरू झाला आहे. त्यातच आता भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर माजी फलंदाज सचिन तेंडुलकरनेही Sachin Tendulkar पिळदार शरीरयष्टी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा जागृत होण्यामागे इंग्लंडच्या एका माजी गोलंदाजाचा हात आहे, असे सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar यांनी सांगितले.

या इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचे नाव ख्रिस ट्रीमलेट आहे. त्याची पिळदार शरीरयष्टी पाहून सचिनदेखील खूप खूश झाला आहे. सचिनने सोशल मीडियावर ट्रीमलेटसोबतचा जिममध्ये ट्रेनिंग करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. सचिनने ख्रिस ट्रीमलेटच्या शरीरयष्टीचं कौतुक तर केलंच. पण ट्रीमलेटसारखी शरीरयष्टी करण्यासाठी मला किती ऑम्लेट खावे लागतील? अशी टिप्पणीसुद्धा केली आहे.

सध्या रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड टी-२० स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये सर्व देशांचे माजी खेळाडू पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसत आहेत. सचिन Sachin Tendulkar आणि ट्रीमलेट रायपूरच्या एकाच हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्याच हॉटेलमधील जिममध्ये दोघेजण एकत्रित व्यायाम करतात. सचिनने सोशल मीडियावर जिम सेशनमध्ये ट्रीमलेटसोबतचा फोटो शेअर केला आहे. “ट्रीमलेट हा माझा सर्वकालीन हीरो असून ट्रेनिंग पार्टनर आहे”, असेसुद्धा सचिनने म्हटले आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts