IMPIMP

राणे विरूध्द शिवसेना : शिवसैनिकांकडून भाजप कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न, जाणून घ्या कुठं घडला प्रकार

by pranjalishirish
sachin vaze case shiv sena agitations against rane family over allegations varun sardesai nashik

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणेंनी युवासेना सचिव वरूण सरदेसाई varun sardesai यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर वरून सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगत राणे कुटुंबावर हल्लाबोल केला, तसेच जर नितेश राणेंनी आरोप सिद्ध करून दाखवले नाही तर त्यांच्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा वरून सरदेसाई यांनी दिला होता. यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटला आहे.

या प्रकरणावरून नाशिकमध्ये शिवसैनिकांनी दोन कुत्र्यांच्या गळ्यात बोर्ड लटकावत नितेश राणे, नारायण राणे आणि निलेश राणेंविरोधात घोषणाबाजी करत भाजपा कार्यालयासमोर राडा घातला आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. त्यामुळे पुढचा वाद थांबला. ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आण घाणेरडे राजकारण भाजपा आणि राणे कुटुंबाकडून करण्यात येत आहे. ते आम्ही शिवसैनिक कधीही सहन करणार नाही, नितेश राणे यांनी पत्रकारपरिषदेद्वारे त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचं आंदोलन केले. जर राणे कुटुंबाने स्वत:ला आवर घातला नाही तर यापेक्षाही खालच्या पातळीवर आंदोलन करू असा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?
भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई varun sardesai यांचीही चौकशी एनआयएने करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटिंग करणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी मागितली होती. या खंडणीत सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालवण्यात येते. सचिन वाझे यांनी या सर्व बेटिंगवाल्यांना फोन करून मोठ्या खंडणीची मागणी केली होती. छापा किंवा अटक टाळायची असेल तर १५० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाझेंकडून करण्यात आली होती. वाझेंनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाई यांनी फोन केला. तेव्हा त्यांनी तुम्ही बुकींकडे जे पैसे मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असे विचारले म्हणजे एक प्रकारे खंडणीच मागितली आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

राणे कुटुंबावर वरूण सरदेसाईंचा हल्लाबोल
राणे यांनी आरोप केल्यानंतर वरूण सरदेसाई varun sardesai यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे. तर राणे यांच्या कुटुंबाचा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यांना राजकीय विरोधकांवर बेछूट आरोप करण्याची सवय आहे. नितेश राणे यांनी केलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि मनाला वेदना देणारे आहेत. यानंतर वरूण यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करावेत अन्यथा फौजदारी स्वरुपाच्या मानहानीच्या खटल्यासाठी तयार रहावे, असा इशाराच वरूण सरदेसाई यांच्याकडून देण्यात आला आहे.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

Related Posts