IMPIMP

Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | ‘अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री मास्क काढून चंद्रासारखा मुखडा दाखवणार’ – सदाभाऊ खोत

by nagesh
Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | after two and a half years the chief minister will take off his mask and show his face like the moon sadabhau khot

गेवराई : सरकारसत्ता ऑनलाइन Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | गेल्या अडीच वर्षापासून सत्ताधारी महाविकास आघाडी
सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि विरोधकात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. अधिकतर भाजप (BJP) आणि
शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी
थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. त्यावेळी ते हिंगणगाव येथे बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हिंगणगाव (Hingangaon) येथील 32 वर्षीय शेतकरी नामदेव जाधव (Namdev Jadhav) याने कारखाना गाळपास ऊस नेत नसल्याने नैराश्यातून तीन दिवसांपूर्वी एक एकर उसाला आग लावून आत्महत्या (Suicide) केली. त्यांच्या कुटुंबाची सदाभाऊ खोत यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सदाभाऊ खोत म्हणाले की, ”अडीच वर्षानंतर आज मुख्यमंत्री मास्क काढून आपला चंद्रासारखा मुखडा दाखवणार आहेत. मात्र, त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्माण करता आलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे.” अशी टीका त्यांनी केली. (Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray)

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, ”महाविकास आघाडी सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे राहिले नाही. साखर कारखानदार आता मक्तेदार असल्यासारखे वागू लागले आहेत. मराठवाड्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच हिंगणगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Web Title : Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | after two and a half years the chief minister will take off his mask and show his face like the moon sadabhau khot

हे देखील वाचा :

Nagpur Crime | नागपूरमध्ये सेक्स रॅकेट ! सापडल्या दिल्ली-मुंबईतील तरुणी; गुन्हे शाखेची कारवाई

Maha TET Scam | टी.ई.टी. परीक्षा घोटाळ्यात डॉ. प्रितिष देशमुख यास जामीन मंजूर

Amazon Discount Offer | ‘अमेझॉन’वर मिळतेय जबरदस्त ऑफर, जवळपास अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता नवीन TV

Related Posts