IMPIMP

Maharashtra Police Accident | बारसू रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, 17 पोलीस जखमी

by nagesh
Barsu Refinery Survey | barsu refinery survey a police car which was going to survey the refinery met with an accident

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police Accident | कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगावर रिफायनरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery Survey) सोमवारी (दि.24) जमिनीचे सर्वेक्षण (Land Survey) होणार आहे. या सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कशेळी बांध येथे अपघात (Police Van Accident) झाला. याठिकाणी पोलीस व्हॅन पलटी होऊन 17 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. आज सकाळपासून बारसू येथील रिफायनरी सर्वेक्षणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्या बंदोबस्तासाठी रत्नागिरी मुख्यालयातून (Ratnagiri Police Headquarters) दोन पोलीस पिंजरा गाड्या जात होत्या. (Maharashtra Police Accident)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कशेळी बांध येथे रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने पोलिसांची गाडी खाली गेली. अघपाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरु करुन जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी (SP Dhananjay Kulkarni) यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात मदतीसाठी थांबवण्यात आले आहे. (Maharashtra Police Accident)

 

सोमवार पासून ड्रिलिंग करुन माती सर्वेक्षण सुरु होणार होते. त्यामुळे सर्व भागात कलम 144 म्हणजे जमावबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. यासोबतच परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 22 एप्रिल ते 31 किंवा या कालावधीपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू असणार आहेत. बारसू सडा बारसू, पन्हाळे, राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ठिकाणी ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किमी परिसरात हे आदेश लागू केले आहेत. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

 

 

ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध

रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून 45 बारसू रिफायनरी आंदोलकांवर 144 CrPC अंतर्गत अनिवार्य प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. काहींना बारसू पंचक्रोशीत तर काहींना जिल्हा नोटिसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी बारसू परिसरात दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Barsu Refinery Survey | barsu refinery survey a police car which was going to survey the refinery met with an accident

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – गुंतवणुकीची पॉलिसी नसताना गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक

Dnyan Prabodhini | ‘प्रकाशचित्रकला – एक कला,एक व्यवसाय’ विषयावर सतीश पाकणीकर यांच्याशी संवाद

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – मनोरुग्ण आरोपी ससूनमधून गेला पळून; आरोपीला एकटे सोडल्याने घेतला फायदा

Get Together Marathi Film | “गेट टूगेदर’ चित्रपटातील “आभास की भास” या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज (Video)

 

Related Posts