IMPIMP

Maharashtra Political News | एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार?, दिल्लीत हालचाली सुरू; संजय राऊतांचा दावा

by nagesh
Maharashtra Political News | sanjay raut big claim on shinde fadnavis government will collapse in the next 15 days movement started in delhi to change the cm

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Political News | ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) कोसळणार असल्याचे भाकित केले आहे. पुढच्या पंधरा ते वीस दिवसात राज्यातील सरकार कोसळेल, सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे, असे म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर सोमवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा (Maharashtra Political News) केला आहे. राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी (Changing Maharashtra CM) दिल्लीत हालचाली सुरु आहेत, असा थेट दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील सरकारला धोका नाही, मात्र मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असं म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरु आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. भुजबळ यांच्याकडे जास्त माहिती असेल तर सांगावी. पण मला माहित आहे की मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु असून येत्या पंधरा दिवसात सरकार पडणार, यावर मी ठाम असल्याचे (Maharashtra Political News) संजय राऊत यांनी सांगितले.

 

 

मिंधे गटासोबत भाजप रसातळाला जात आहे

राज्याचं नेतृत्व करण्यात आणि भाजपला (BJP) हवं ते साध्य करण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपयशी ठरले आहेत. भाजपला आमचे सरकार पाडायचे होते. त्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर झाला, ते काम पूर्ण झाले आहे. पण राजकीयदृष्ट्या भाजपला महाराष्ट्रात ताकद देण्यात हे मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. सरकार आल्यापासून मिंधे गटासोबत भाजप रसातळाला जात आहे, बदनाम होत आहे. या सरकारचे आता थोडेच दिवस शिल्लक राहिले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

 

 

मुख्यमंत्री सध्या तणावात

दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत की नाही, हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारा. या सगळ्यामुळे मुख्यमंत्री सध्या तणावात आहेत. ते हल्ली मंत्रालयात जातात का हे विचारा, तणावामुळे शिंदे ठाण्यात बसून आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political News | sanjay raut big claim on shinde fadnavis government will collapse in the next 15 days movement started in delhi to change the cm

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | ‘राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही’, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

Maharashtra Police Accident | बारसू रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, 17 पोलीस जखमी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – गुंतवणुकीची पॉलिसी नसताना गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिषाने पाऊण कोटींची फसवणूक

 

Related Posts