IMPIMP

Sainath Babar-Vasant More | पुणे मनसेच्या आजी-माजी शहराध्यक्षांची ‘चाय पे चर्चा’! वसंत मोरेंनी साईनाथ बाबर यांना दिल्या शुभेच्छा

by nagesh
Sainath Babar-Vasant More | mns new city presidents sainath babar and vasant more meet on tea in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sainath Babar-Vasant More | गुढीपाडवा मेळाव्या दरम्यान बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. भोंगे जर काढत नसतील तर त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्याचा आदेश त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज मोरे यांचे पुणे शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची मनसे शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर दोन्ही आजी – माजी शहराध्यक्ष एकत्र दिसून आले आहेत. (Sainath Babar-Vasant More)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबईत (Mumbai) राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची पुणे मनसेचे शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर साईनाथ बाबर यांनी माजी शराध्यध्यक्ष वसंत मोरे यांची कात्रज (Katraj) येथे भेट घेतली आहे. भेटीदरम्यान वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावेळी भेटीदरम्यान चाय पे चर्चा ही केली आहे. (Sainath Babar-Vasant More)

 

साईनाथ बाबर यांंनी वसंत मोरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, वसंत मोरे यांची पुणे शहराच्या शहराध्यक्षपदावरुन दूर सारत त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांच्या खांद्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पदावरून दूर सारल्यानंतर वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.

 

 

Web Title :- Sainath Babar-Vasant More | mns new city presidents sainath babar and vasant more meet on tea in pune

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar on Imtiyaz Jaleel | शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जादा महत्वाचे वाटतात का ? MIM च्या सवालावर अजित पवारांनी दिलं उत्तर..

What Is The Right Time To Eat Fruits | फळ खाण्याची योग्य वेळ कोणती ?

Rohit Pawar on Sanjay Raut | रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले – ‘राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत’

 

Related Posts