IMPIMP

Ajit Pawar on Imtiyaz Jaleel | शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जादा महत्वाचे वाटतात का ? MIM च्या सवालावर अजित पवारांनी दिलं उत्तर..

by nagesh
Ajit Pawar on Imtiyaz Jaleel | ajit pawar replied on aimim imtiaz jaleel comment saying ncp sharad pawar meet modi for raut not for nawab malik

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar on Imtiyaz Jaleel | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी राज्यातील ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ED ने केलेल्या कारवाईवरुन मुद्दा उपस्थित केला. मात्र तेव्हा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचा (Nawab Malik) मुद्दा उपस्थित केला नसल्याची चर्चा आहे. ‘राऊतांच्या अटकेनंतर इतक्या घाईने पंतप्रधानांसमोर मुद्दा उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा ते जास्त महत्वाचे वाटतात का ?’ असा सवाल MIM ने उपस्थित केला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar on Imtiyaz Jaleel)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”शरद पवारांनी इतकी घाई त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक अटक झाल्यानंतर का दाखवली नाही ?”, अशी विचारणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली आहे. ”फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा ? का ? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुम्हाला इतक्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही ? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे तुमचे स्वत:चे असे वेगळेच खेळ आहेत शरद पवार.” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं आहे. तसेच “तुमचे मंत्री नवाब मलिक यांना अटक होऊन ते तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही ?” असं देखील ते म्हणाले. (Ajit Pawar on Imtiyaz Jaleel)

 

दरम्यान, यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. इम्तियाज जलील यांनी केलेल्या टिकेसंदर्भात पत्रकारांनी अजित पवार यांना विचारलं आहे. शरद पवारांनी संजय राऊत यांच्यासाठी पंतप्रधानांशी भेट घेतली मात्र नवाब मलिक व अनिल देशमुख यांचा त्यांना विसर पडला का ? असा प्रश्न जलील यांच्या टीकेचा संदर्भ देत विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, “काहीजण अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पद्धतीने पसरवून विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar on Imtiyaz Jaleel | ajit pawar replied on aimim imtiaz jaleel comment saying ncp sharad pawar meet modi for raut not for nawab malik

 

हे देखील वाचा :

What Is The Right Time To Eat Fruits | फळ खाण्याची योग्य वेळ कोणती ?

Rohit Pawar on Sanjay Raut | रोहित पवारांचा संजय राऊतांना सल्ला; म्हणाले – ‘राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत’

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला 11 वा हप्ता जमा होणार

 

Related Posts