IMPIMP

Salaam Venky Movie | ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

by nagesh
Salaam Venky Movie | salaam venky trailer out now kajol film released on 9th december

सरकारसत्ता ऑनलाईन – हिंदी चित्रपटसृष्टीत बॉलीवूड अभिनेत्री काजोलने (Bollywood actress Kajol) तिची दुसरी इनिंग सुरू केली आहे.विशेष म्हणजे आता काजोल अशा विषयावर आधारित चित्रपट निवडत आहे जे थेट प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडतील.दरम्यान आता अशातच काजोल लवकरच ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky Movie) मध्ये दिसणार आहे.महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटात एका आजारी मुलाची आणि आईची कथा दाखवण्यात येणार आहे.आता विशेष म्हणजे काजोलच्या चित्रपटाचा ट्रेलर (Salaam Venky Movie Trailer) बालदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच हा ट्रेलर जो खूपच भावूक आहे आणि प्रेक्षकांशी थेट कनेक्ट होत आहे. 2 मिनिटे 18 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, खूप भावना आणि खूप मजा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

इतकच नाही तर या ट्रेलरमध्ये काजोलच्या दमदार अभिनयासोबतच मस्त संवादही आहेत.’सलाम वेंकी’ (Salaam Venky Movie) या चित्रपटाचे दिग्दर्शन रेवतीने केले असून या चित्रपटात काजोलसोबत विशाल जेठवा (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal) आणि आहाना कुमरा (Ahana Kumara) देखील विशेष भूमिकेत दिसणार आहेत.’सलाम वेंकी या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात काजोल आणि विशाल जेठवा हे दोघ आई आणि मुलाच्या भूमिकेतून होते. तसेच या दोघांमध्ये खूप धमाल होते.मुळात संपूर्ण ट्रेलरमध्ये काजोल आपल्या मुलाची काळजी घेताना दिसत आहे, परंतु यादरम्यान विशालने त्याच्या आईकडे एक मागणीही केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ट्रेलरमध्ये राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा एक संवादही आहे, ज्यामध्ये काजोलचा मुलगा म्हणतो की,
‘जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिये’. दरम्यान काजोलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर
‘सलाम वेंकी’चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक बडी जिंदगी
का बडा सेलिब्रेशन सुरू होणार आहे. सुजाता आणि व्यंकटेश यांचा अतुलनीय प्रवास फक्त ९ डिसेंबर रोजी सिनेमागृहात पहा.’

 

Web Title :- Salaam Venky Movie| salaam venky trailer out now kajol film released on 9th december

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | ‘असल्या आरोपांतून घरे उद्धवस्त होतील, त्यापेक्षा राजकारणात न राहिलेले बरे’ – जितेंद्र आव्हाड

Haryanvi Dancer Gori Nagori | हरियाणवी डान्सर गोरी नागोरीच्या ‘या’ गाण्यावरील डान्स पाहुन चाहते झाले घायाळ, सोशल मिडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल (VIDEO)

Pune Crime | मार्केट यार्ड गोळीबार प्रकरण ! कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक; आरोपींमध्ये मंगळवार पेठ, रामनगर-वारजे, शिवणे, शिवाजीनगर परिसरातील तरूणांचा समावेश

 

Related Posts