IMPIMP

Sambhajiraje Chhatrapati | कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर खा. संभाजीराजेंचं मोठं विधान; म्हणाले…

by nagesh
Rajya Sabha Election Results | rajyasabha election shivsena dhananjay mahadik wins sanjay pawar loose. Sambhaji raje supporter Dhananjay Jadhav on shivsena and mp sanjay raut

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Sambhajiraje Chhatrapati | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी (Kolhapur North Assembly By-Election) आज (मंगळवार) मतदान होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमने – सामने आहेत. याआधी अत्यंत चुरशीने प्रचार करण्यात आला. दरम्यान, आज खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर खा. संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची मुदत 3 मे रोजी संपत असून मोठा निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत दिलेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”मतदान करणे हा सर्वांचा लोकशाहीचा अधिकार आहे आणि सगळ्यांनी करावे म्हणून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज कोल्हापूरला आलो.
बराच विचार करून मतदान केले.
मला सुद्धा 30 सेकंद लागले विचार करण्यासाठी, पण तरी देखील तो मोठा आनंद असतो.
कितीही मोठा व्यक्ती असला, ज्यावेळी मतदान करतो तेव्हा विचारपूर्वक करतो.”
असं संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, ”भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले की राजेंनी जे मराठा समाजासाठी अश्रू पाहिले.
त्याचा वचपा येथील जनता काढेल. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे.
माझ्या सामाजिक चळवळींवर कोण त्याचा अर्थ कसा काढते हे मी काय करू शकत नाही मी सामान्य गरीब लोकांसाठी माझा लढा असतो.
त्यातलाच एक भाग म्हणून उपोषण केलं होतं. त्यावर कुणी काय बोलावं आणि काय भूमिका घ्यावी ते मी काय सांगू शकत नाही.
माझ्या परीने मी प्रामाणिक काम करत असतो आणि प्रामाणिक काम करत असताना परिणाम काय याचा विचार करत नाही.”

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने आगामी भूमिका काय असेल असं विचारण्यात आल्यावर, ”वेट अँन्ड वॉच, 3 मे ला माझी टर्म संपत आहे,
निश्चित वेगळी भूमिका असेल याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, तोपर्यंत वाट पाहा.” असं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | clear signal of big decision from Sambhajiraje Chhatrapati

 

हे देखील वाचा :

Pune Crime | द्रुतगती मार्गावर लघुशंकेसाठी थांबले अन् दरोडेखोरांनी गाठले, ट्रक चालकला लुटणाऱ्या 5 जणांच्या टोळीला अटक

Kishori Pednekar | ‘कमळातला हा चिखल गेला कुठे?’; किशोरी पेडणेकरांचा सोमय्यांवर निशाणा

Pune Crime | ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेकडून अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts