IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊत इज बॅक, ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; अखेर जामीन अर्ज मंजूर

by nagesh
Sanjay Raut 'Shiv Sena will put up a big fight in the future' - Sanjay Raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Goregaon Patra Chawl Scam) शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत (Pravin Raut) आणि संजय राऊत (Sanjay Raut) या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर (Bail Application Granted) करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) जून महिन्यात अटक (Arrest) केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयात (PMLA Court) हजर करण्यात आले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.

आज कोर्टामध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
प्रचंड गर्दी  टाचणी पडली तरी आवाज येईल, एवढी शांतता होती. सर्वांचं लक्ष न्यायाधीश एम. जी. देशपांडे (Judge M.G. Deshpande) यांच्या निकालाकडे लागले होते. तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Sanjay Raut | sanjay raut granted bail in goregaon patrachawl case

 

हे देखील वाचा :

Kapil Patil | कपिल पाटलांचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘देशातील नागरिकांना वेळीच जाग आली नाही तर भारताच्या राष्ट्रध्वजावर एक दिवस…’

Deepali Sayyad | ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; केले गंभीर आरोप

Aditya Thackeray | नोटीस देण्याआधी खोके म्हणजे नक्की काय? सांगावं, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

 

Related Posts