IMPIMP

Sanjay Raut | ‘ED, CBI, NCB ही 3 चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा’; संजय राऊतांचं अमित शहांना प्रत्युत्तर

by nagesh
 Sanjay Raut | shivsena mp sanjay raut accept home minister amit shah challenge saying fight with us without help of ed cbi ncb

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sanjay Raut | भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) काल (रविवारी) पुणे दौऱ्यावर होते. भाजपच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अमित शहा यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला. राजीनामा देऊन निवडणुकीला सामोर जा, तिघांविरोधात लढा. मग बघा काय अवस्था होते’ असं म्हणत शहा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले होते. ठाकरे यांना दिलेल्या या थेट आव्हानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘अमित शहाजी काल पुण्यात आले आणि त्यांचं जे काय वक्तव्य आहे ते पूर्णपणे असत्याला धरून आहे. ते नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या नेत्याविषयी, आमच्या भूमिकांविषयी, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करुन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमीत करण्याचा प्रयत्न सुरूय, पण जनता विश्वास ठेवायला तयार नाही. असं ते म्हणाले.

पुढे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘महाराष्ट्राचं सरकार उत्तम चाललं आहे.
केंद्राने प्रयत्न करुनही सरकारचं एक कवचाही उडालेला नाहीये याचं दु:ख आम्ही समजू शकतो.
तुमच्या संपूर्ण यंत्रणा फेल गेल्या आहेत. आपण जे म्हणताय ना राजीनामा द्या आणि आमच्याशी आमने-सामने लढा,
तुम्ही जी 3-3 चिलखतं घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय ना? CBI, ED आणि NCB एनसीबी ही 3 चिलखतं घालून तुम्ही आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताय ना,
ही चिलखतं दूर करा आणि आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत आम्ही पाठीमागून हल्ले करत नाही.
आम्ही समोरूनच लढतो आणि आत्तापर्यंत समोरुनच लढत आलो आहोत.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, ‘हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने (Shiv Sena) कधी सोडला नाही आणि सोडणारही नाही.
2014 साली आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला दूर करताना सत्तेसाठी..
फक्त सत्तेसाठी आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा
असं राज्यातील भाजप नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते? हे शहांनी स्पष्ट करावं.’ असं सजय राऊत म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut accept home minister amit shah challenge saying fight with us without help of ed cbi ncb

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | पाय पसरतोय ओमिक्रॉन ! पुण्याच्या जुन्नरमधील 5 वर्षाच्या मुलासह महाराष्ट्रात 6 नवीन केस, देशात आतापर्यंत 151 प्रकरणे

Chandrakant Patil | ‘पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं’ – चंद्रकांत पाटील

Maharashtra Temperature | संपूर्ण राज्य गारठले, सर्वत्र हुडहुडी ! महाराष्ट्रात थंडीची लाट, 2 दिवस होणार तापमानात आणखी घट; पुण्यातील तापमान उद्या 10 तर उत्तर महाराष्ट्रात 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता

 

Related Posts