IMPIMP

Omicron Covid Variant | पाय पसरतोय ओमिक्रॉन ! पुण्याच्या जुन्नरमधील 5 वर्षाच्या मुलासह महाराष्ट्रात 6 नवीन केस, देशात आतापर्यंत 151 प्रकरणे

by nagesh
Omicron Covid Variant | omicron coronavirus variant cases in india 151 maharashtra delhi covid 19

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Omicron Covid Variant | भारतात, Omicron या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. भारतात ओमिक्रॉनची आणखी 6 नवीन प्रकरणे महाराष्ट्रात आढळली. 45 वर्षीय अनिवासी भारतीय आणि नुकताच ब्रिटनमधून गुजरातला परतलेला एक किशोरवयीन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले असून, भारतात रविवारी रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली. (Omicron Covid Variant)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आहेत
केंद्र आणि राज्य अधिकार्‍यांनुसार, आतापर्यंत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश- महाराष्ट्र (54), दिल्ली (22), राजस्थान (17), कर्नाटक (14), तेलंगणा (20), केरळ (11), गुजरात (9) आंध्र प्रदेश (1), चंदीगड (1), तामिळनाडू (1) आणि पश्चिम बंगाल (1) मध्ये ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत.

 

महाराष्ट्रात रविवारी 6 जणांना लागण
महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) सांगितले की, रविवारी सहा जणांना कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटची (Omicron Covid Variant) लागण झाल्याचे आढळून आले. तसेच राज्यात या व्हेरिएंटची लागण झालेल्यांची संख्या 54 झाली आहे. यापैकी दोन रुग्ण टांझानियाला गेले होते. तसेच, दोघे इंग्लंडमधून परतले आहेत तर एकाने पश्चिम आशियाचा प्रवास केला आहे. या सर्वांचे पूर्णपणे लसीकरण झाले होते.

पुण्यातील जुन्नर येथील 5 वर्षांच्या मुलाला संसर्ग
दुसरा रुग्ण पुण्यातील (Pune) जुन्नर (Junnar) येथील पाच वर्षांचा मुलगा (omicron 5 year old Patient) आहे,
जो जुन्नरमधील दुबईहून (Dubai) आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात होता, असे विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ’ओमिक्रॉनची सहा नवीन प्रकरणे नोंदवली गेली – त्यापैकी मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) तपासणीदरम्यान 4 जणांमध्ये संसर्ग आढळून आला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

या 4 रुग्णांपैकी एक रुग्ण मुंबईतील (Mumbai) आहे. दोन कर्नाटकातील आणि एक औरंगाबादचा (Aurangabad)आहे.
राज्यातील एकूण 54 रुग्णांपैकी मुंबईत 22 केस आढळून आल्या आहेत.

 

Web Title :- Omicron Covid Variant | omicron coronavirus variant cases in india 151 maharashtra delhi covid 19

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं’ – चंद्रकांत पाटील

Maharashtra Temperature | संपूर्ण राज्य गारठले, सर्वत्र हुडहुडी ! महाराष्ट्रात थंडीची लाट, 2 दिवस होणार तापमानात आणखी घट; पुण्यातील तापमान उद्या 10 तर उत्तर महाराष्ट्रात 8 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता

Pune Crime | पुण्यात 14 वर्षाच्या दोघांनी 10 वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

 

Related Posts