IMPIMP

Sanjay Raut | ‘…अब बरबाद भी हम करेंगे, भाजपचे साडेतीन लोक कोठडीत जाणार’ – संजय राऊत

by nagesh
MP Sanjay Raut | thackeray group leader sanjay rauts reaction on the disagreement in mahavikas aghadi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | मागील काही दिवसांपासून शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. त्यामुळे दोन पक्षातील दुरावा अधिकच वाढताना दिसत आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला एक इशाराच दिला आहे. ”हमने बहुत बरदाश्त किया है ना.. तो बरबाद भी हम ही करेंगे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ”उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद होईल. या पत्रकार परिषदेला संपूर्ण पक्ष उपस्थित असेल. पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, पदाधिकारी हजर असतील. उद्या आम्ही बोलू आणि संपूर्ण देश ऐकेल.” पुढे ते म्हणाले, ”केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना नेते, ठाकरे कुटुंबावर सातत्यानं चिखलफेक सुरू आहे. आरोप केले जाताहेत. या सगळ्या आरोपांना उद्या आम्ही शिवसेना भवनातून उत्तर देऊ. उद्या काय होतं ते पाहाच. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ती मर्यादा त्यांनी ओलांडलीय. आता पुढे काय होतंय ते बघा.’

 

पुढे संजय राऊत म्हणाले, ”माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ (Anil Deshmukh) महाविकास आघाडीचे मंत्री तुरुंगात जातील.
त्यांच्या कोठडीच्या बाजूला त्यांची जागा असेल असे भाजपचे नेते सांगत असतात.
पण आगामी काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील.
राज्यात सरकार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा,” अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

 

दरम्यान, ”आम्हाला वारंवार धमक्या दिल्या जाताहेत. आव्हानं दिली जात आहेत.
राजकारणात एक मर्यादा असते. ती ओलांडली गेली आहे.
हमाम सब नंगे होते है. आम्हाला धमक्या देऊ नका.
तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही. मी तर अजिबात घाबरत नाही. तुम्हाला जे करायचं ते करा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Sanjay Raut | some bjp leaders will go to jail says shiv sena mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

EPFO Facility | पीएफ अकाऊंटमधून विम्याचा हप्ता देखील भरता येतो, जाणून घ्या ‘ईपीएफओ’च्या सुविधेबाबत

Nashik Crime | प्रेयसीने पेटवून दिलेल्या तरुणाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच मृत्यु; प्रचंड खळबळ

Aditya Thackeray | ‘सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आले’ – आदित्य ठाकरे

 

Related Posts