IMPIMP

Satara Crime News | साताऱ्यातील ‘त्या’ खुनातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश; दापोलीमधून आरोपींना अटक

by nagesh
Satara Crime News | three people who killed friend were taken into custody by the police satara crime news

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – Satara Crime News | काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील खानापुर (ता. वाई) या ठिकाणी अभिषेक जाधव या युवकाचा खून करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण वाई जिल्हा हादरला होता. या प्रकरणातील आरोपी खून करून पसार झाले होते. त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर पोलिसांना यामध्ये यश आले आहे. सातारा पोलिसांनी दापोली पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील आरोपींना दापोली शहरातील बुरोंडी नाका येथे हर्णै मार्गावर असलेल्या सागरी पोलीस चेक नाका येथून अटक करण्यात आली आहे. शनिवारी 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे. (Satara Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कशा प्रकारे केली अटक?
या प्रकरणातील आरोपी दापोली तालुक्यात असल्याची माहिती सातारा पोलिसांना गुप्तप्रकारे समजली होती. यानंतर पोलिस आरोपींचे मोबाईल ट्रेस करून दापोली इथे दाखल झाले. सातारा पोलिसांचे पथक गेले दोन दिवस दापोली तालुक्यात या संशयित आरोपींसाठी सर्च ऑपरेशन करत होते. पोलिसांच्या पथकाला हे तीनही संशयित आरोपी चकवा देत होते. दुचाकीवरून ट्रिपल सीट हे आरोपी हर्णैकडून दापोलीच्या दिशेने येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. यानंतर सातारा पोलिसांनी सापळा रचून दापोली शहरातील बुरोंडी नाका चेक पोस्ट या ठिकाणाहून ताब्यात घेतले. रहीम मुलाणी व प्रज्वल जाधव व अन्य एक अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

 

सातारा जिल्हा व राज्यासह परराज्यातील गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे यांनी जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई केली आहे. या तपास कामात अवघ्या तीस तासात यश प्राप्त केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, वाईच्या डिवायएसपी शितल जानवे खराडे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे, आशीष कांबळे, महिला पिएसआय स्नेहल सोमदे तसेच दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू नलावडे व उपनिरीक्षक अशोक गायकवाड यांचीही सातारा पोलिसांच्या पथकाला मोठी मदत झाली. (Satara Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे प्रकरण?
साताऱ्यातील वाई तालुक्यातील परखंदीच्या शिवारात दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आहे.
मृत पावलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव अभिषेक जाधव असे असून तो खानापूर येथील रहिवाशी होता.
या घटनेमुळे वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
प्रेम प्रकरणातून हि हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या घटनेमुळे खानापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळच्या सुमारास परखंदी गावातील काही नागरिक हे शेताकडे जात असताना त्यांना अभिषेकचा मृतदेह
आढळून आला. यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वाई पोलिसांना दिली होती.

 

 

Web Title :- Satara Crime News | three people who killed friend were taken into custody by the police satara crime news

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | ‘…तर आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ;’ कसबा पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचे नाना पटोले यांना आव्हान

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : जाती – धर्माच्या भिंतीपालिकडला ‘आपला माणूस’ रविंद्र धंगेकर यांना काँग्रेस कडून उमेदवारी; धंगेकर विरुद्ध भाजप-युतीचे उमेदवार रासने अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार

 

Related Posts