IMPIMP

Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील ”त्या” पोस्टरने खळबळ; भाजपच्या गोटात वाढली चिंता

by nagesh
Pune Kasba Peth Bypoll Election | After Medha Kulkarni, Mukta Tilak, Girish Bapat's constituency also went? BJP's headache increased as the displeasure of the Brahmin community in Pune came to the fore through the banner fight

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | चिंचवडला जगताप यांच्या घरातच तिकीट दिले असतानाच कसब्यात मात्र
भाजपने वेगळा न्याय लावत टिळक घराण्याला तिकीट नाकारले. त्याची दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांचे पती शैलेश
टिळक (Shailesh Tilak) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यात काँग्रेसने रवींद्र धंगेकर असा तुल्यबळ उमेदवार दिला. पाठापोठ कसब्यात (Pune
Kasba Peth Bypoll Election) लागलेल्या एका पोस्टरने भाजपची (BJP) चिंता वाढली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

कसबा विधानसभा मतदारसंघ म्हणजे अस्सल पुणेरी म्हटल्या जाणार्‍या लोकांचा मतदारसंघ. सदाशिव, नारायण, शनिवार पेठेत ब्राम्हण समाजाचे वर्चस्व होते. शहरातील महत्वाच्या घडामोडीवर या समाजाचे वरचष्मा असायचा. मात्र, आता समाजाला दूर लोटले जात असल्याचे म्हणणे या समाजातून व्यक्त होऊ लागले आहे. ब्राम्हण महासंघाने समाजातील ही खदखद एकत्रित करण्याचा यापूर्वी अनेकदा प्रयत्न केला.

मागील विधानसभेत सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या मेधा कुलकर्णी यांचे कोथरुडमधील तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर आता मुक्ता टिळक यांचे घरातील तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यात ब्राम्हणांना प्रतिनिधीत्व राहिले नसल्याची खंत एका पोस्टरमधून व्यक्त करण्यात आली आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

कुलकर्णीचा मतदार संघ गेला….
टिळकांचा मतदार संघ गेला….
आता नंबर बापटांचा का ???
..समाज कुठवर सहन करणार ?
कसब्यातील एक जागरुक मतदार

असे पोस्टर लावण्यात आले आहे. त्याचवेळी ब्राम्हण महासंघाचे नेते आनंद दवे (Hindu Mahasangh Leader Anand Dave) यांनी आपण कसबा पेठ पोटनिवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. ब्राम्हण वर्ग हा प्रामुख्याने भाजपचा पारंपारीक मतदार मानला जातो. या मतदारांमुळे पुण्यातील कसबा, शिवाजीनगर तसेच कोथरुडमध्ये भाजप मोठ्या संख्येने विजय मिळवत आला आहे. आता हा समाजच दूर गेला व त्या मतात फुट पडली तर भाजपच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कसब्याबाबत भाजपच्या चिंतेत भर पडली आहे.

Web Title : Pune Kasba Peth Bypoll Election | “That” poster stirs excitement in the town; Anxiety increased in the BJP fold

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : जाती – धर्माच्या भिंतीपालिकडला ‘आपला माणूस’ रविंद्र धंगेकर यांना काँग्रेस कडून उमेदवारी; धंगेकर विरुद्ध भाजप-युतीचे उमेदवार रासने अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार

Sunny Leone | धक्कादायक! इंफाळमध्ये सनी लिओनीच्या कार्यक्रमात ग्रेनेड स्फोट

Aurangabad Crime News | सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या शिक्षिकेने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल; औरंगाबादमधील घटना

 

Related Posts