IMPIMP

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

by nagesh
Shamna Kasim | malyalam actress shamna kasim announces her pregnancy after 3 months of marriage

सरकारसत्ता ऑनलाईन – Shamna Kasim | सध्या चित्रपटसृष्टीमध्ये लग्नसराईचा मोसम दिसत आहे आणि त्यामध्येच 2022 या वर्षात अनेक अभिनेत्रींनी गुड न्यूज देखील दिले आहेत. नुकतेच आलिया भट्टने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलियाने लग्नाच्या काही महिन्यातच गोड बातमी चाहत्यांसाठी शेअर केली होती. दाक्षिणात्य अभिनेत्रीने देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. हे ऐकून चाहते देखील प्रचंड आनंदित झाले आहेत. (Shamna Kasim)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शमना कासिम (Shamna Kasim) हिने गुड न्यूज दिली आहे. शमनाने ऑक्टोबर 2022 मध्ये उद्योगपती शनिद आसिफ अलीसोबत विवाह केला होता. आता तिने इंस्टाग्राम वर ही बातमी शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने बेबी बम्प दाखवताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

शमनाने ही बातमी शेअर करताच चाहते तिला शुभेच्छा देत आहेत आणि कलाकारही तिला शुभेच्छा देताना
दिसत आहेत. 24 ऑक्टोबर 2022 मध्ये तिने उद्योगपती शनिद सोबत दुबईमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न
केले होते. लग्नाच्या तीन महिन्यातच तिने गुड न्यूज दिल्याने चाहते देखील आनंदीत आहेत.
शमनाने आजवर अनेक तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटात काम केले आहे.
तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःची जागा निर्माण केली आहे.
सध्या शमनाने दिलेल्या या बातमीवर चाहते आनंदी झाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shamna Kasim | malyalam actress shamna kasim announces her pregnancy after 3 months of marriage

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल

Sanjay Raut | मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावरील संजय राऊतांच्या उत्तराला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर, म्हणाले…

 

Related Posts