IMPIMP

Shankarrao Gadakh | शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाईड नोटमध्ये मंत्र्याचं नाव?; भाजपने केली चौकशीची मागणी

by nagesh
Shankarrao Gadakh | former bjp mla balasaheb murkute levels allegations against minister shankarrao gadakh in nagar

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Shankarrao Gadakh | शिवसेना नेते आणि मृद व जलसंधारण मंत्री, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्याशी संबंधित मुळा एज्युकेशन संस्थेतील एका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्या कर्मचाऱ्याने मंत्री गडाख आणि त्यांचे बंधू विजय गडाख यांची नावे घेतली. यामुळे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे (Balasaheb Murkute) यांनी त्या दोघांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकरीला असलेल्या प्रतीक बाळासाहेब काळे (Pratik Balasaheb Kale)
(रा. नेवासा) या तरुण कर्मचाऱ्याने नुकतीच गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. त्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ तयार केला असून तो व्हायरल झाला आहे. त्यात त्याने संस्थेतील वरिष्ठ अधिकारी आणि संस्थाचालक म्हणून गडाख कुटुंबातील काही सदस्यांची नावे घेतली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी संस्थेशी संबंधित 7 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यामधील चारजण ताब्यात घेतले आहे. पण यामध्ये गडाख कुटुंबीयांचा समावेश नाही.

 

गडाख यांच्याविरोधात नगरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपचे माजी आमदार मुरकुटे यांनी याही प्रकरणाचा उल्लेख करून चौकशीची मागणी केली आहे.
आमदार मुरकुटे यांनी म्हटले आहे की, काळे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव आहे.
काळे यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये जलसंधारण मंत्री गडाख, त्यांच्या पत्नी, तसेच भाऊ विजय गडाख यांचीही नावे घेतली आहेत.
त्यामुळे या प्रकरणी गडाख यांची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्री गडाख यांचा राजीनामा घ्यावा,
अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, गडाख कुटुंबातील एका महिलेने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती.
त्याचाही उल्लेख करून मुरकुटे यांनी त्याचे पुढे काय झाले, असा सवाल उपस्थित केला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुक्यातील नेते संजय लक्ष्‍मण सुखदान (Sanjay Laxman Sukhdan) यांच्यावर मंत्री गडाख अन्याय करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने सोमवारी नगरमध्ये आंदोलन केले.
त्यामध्ये माजी आमदार मुरकुटे हे देखील सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या ‘वंचित’च्या नेत्यांनीही मंत्री गडाख (Shankarrao Gadakh) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

Web Title : Shankarrao Gadakh | former bjp mla balasaheb murkute levels allegations against minister shankarrao gadakh in nagar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात खंडणी मागितल्याची तक्रार केल्याच्या रागातून भरदिवसा व्यावसायिकावर सपासप वार

Chandrakant Patil | ‘सरकार तुमचं असताना अन्याय-अन्याय म्हणून का ओरडायचं?’

Nawab Malik | ‘है तैयार हम’ ! ‘फडणवीसांनी शरद पवारांऐवजी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावे’

 

 

Related Posts