IMPIMP

Shasan Aplya Dari | भोर उपविभागाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे 30 मे आयोजन

by nagesh
Shasan Aplya Dari | Organizing Shasan Aaya Dari campaign under Bhor sub-division on 30th

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Shasan Aplya Dari | भोर उपविभागाअंतर्गत (Bhor Sub Division) ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय नसरापूर (Kumbharkar Lawns in Nasrapur) आणि गंगोत्री सभागृह भोर (Gangotri Hall in Shivaji Collage Road Bhor) येथे ३० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे (Sub Divisional Officer Rajendra Kachare) यांनी केले आहे. (Shasan Aplya Dari)

वेळू, नसरापूर आणि किकवी (Kikvi) या मंडळातील गावांसाठी कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय, नसरापूर आणि भोर, भोलावडे, संगमनेर, आंबवडे व निघूडघर या मंडळातील गावांसाठी गंगोत्री सभागृह भोर येथे आयोजन करण्यात आले आहे. (Shasan Aplya Dari)

या अभियानात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात, रहिवासी, प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे,जीर्ण किंवा खराब शिधापत्रिका बदलणे, नविन शिधापत्रिका अर्ज स्विकृती, सामाजिक विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा, दीर्घकालीन आजार, दिव्यांगासाठीच्या योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे, दिव्यांगासाठी आधार कार्ड नोंदणी करणे आदी सेवा देण्यात येणार आहेत.

घरगुती नवीन वीज कनेक्शन, कोविड प्रतिबंधक लसीकरण, एस.टी. पास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी,
विवाह नोंदणी प्रमाणपत्र-अर्ज स्वीकृती, पंचायत समितीअंतर्गत विविध विभाग,कृषी,भुमी अभिलेख, योजना,आरोग्य,
पोस्ट, वन, लाभ, राज्य परिवहन महामंडळ, पशुसंवर्धन, नगरविकास,पाटबंधारे विभागाच्या योजना
व सेवेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.

Web Title : Shasan Aplya Dari | Organizing Shasan Aaya Dari campaign under Bhor sub-division on 30th

Related Posts