IMPIMP

Sheezhan Khan | ‘मी निर्दोष आहे आणि…’; तुनिषा शर्मा प्रकरणावर आरोपी शीझान खानची प्रतिक्रिया

by nagesh
Sheezhan Khan | tunisha sharma suicide case sheezan khan says have faith in judiciary i am innocent read details

सरकारसत्ता ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Sheezhan Khan) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी तुनिषाच्या आईने अभिनेता शीझान खानवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या तक्रारीवरून तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात अभिनेता शीझान खानला (Sheezhan Khan) अटक करण्यात आली. या प्रकरणी न्यायायलाने शीझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी मुख्य आरोपी शीझान खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाला शीझान खान?
शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितले कि, शीझान निर्दोष आहे. “वसई कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खाननं आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी शीझान म्हणाला कि, “माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे. ‘सत्यमेव जयते..!”

 

शीझान जामिनासाठी अर्ज करणार
शीझानचे वकील मिश्रा यांनी सांगितले कि, शीझान (Sheezhan Khan) सोमवारी कोर्टात या खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहे. “आम्ही खटल्याशी संबंधित काही प्रमाणित कागदपत्रांसाठी अर्ज केला आहे. ती मिळाली की, जामीन अर्ज दाखल करणार आहोत.”

 

काय आहे प्रकरण ?
तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी अली बाबा दास्तान-ए-काबुल या टीव्ही शोच्या सेटवर गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. यानंतर 25 डिसेंबर रोजी पोलिसांनी शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तुनिषाची आई वनिता यांनी शीझान विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sheezhan Khan | tunisha sharma suicide case sheezan khan says have faith in judiciary i am innocent read details

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावरील संजय राऊतांच्या उत्तराला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर, म्हणाले…

Gopichand Padalkar | पडळकरांच्या मागणीवर सरकार सकारात्मक; उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यांनंतर बदलणार ‘या’ जिल्ह्याचे नाव

Maharashtra Politics | ‘आम्ही 50 जण एकदिलाचे, 15 राहिलेत, किती सांभाळता येतील ते सांभाळा’

 

Related Posts