IMPIMP

Shilpa Shetty | बहिण शमिताला पाठिंबा देत शिल्पा शेट्टीने केली पोस्ट, म्हणाली – ‘आम्ही श्रीमंत घराण्यात जन्मलो नाही…’

by nagesh
Shilpa Shetty | bigg boss 15 shilpa shetty angry at those who trolled shamita shetty gave a befitting reply saying we were not born rich

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shilpa Shetty | बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहिण शमिता शेट्टी Bigg Boss 15 च्या घरात सहभागी झाली आहे. बिग बाॅस 15 हा सिझन सर्वात जास्त बोरिंग (Boring) असल्याचं प्रक्षेकांचं म्हणं आहे. एवढंच नाही तर या सिझनमुळे बिग बाॅसची टीआरपी (TRP) देखील कमी झाली होती. टीआरपी वाढवण्यासाठी मागील सिझन्समधील 3 अभिनेत्रींची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करण्यात आली. यामध्ये रश्मी देसाई (Rashmi Desai), राखी सावतं (Rakhi Sawant) आणि देवोलिन भट्टाचार्यजी (Devoleena Bhattacharjee) यांचा समावेश आहे. या तिघींच्या एन्ट्रीने बिग बाॅस 15 मध्ये ट्वीस्ट आणलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

व्हिआयपी सदस्य वारंवार नाॅन व्हिआयपी सदस्यांवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे बिग बाॅसच्या घरात वारंवार वाद होताना दिसत आहे. यादरम्यान देवोलिनाने शिमातवर निशाणा साधत तिला दोगले असल्याचा टॅग दिला होता. ज्यावरुन शमिता प्रचंड नाराज झाली असून तिने याबाबत उत्तर देखील दिलं होतं.यावरुनच आता शिल्पाने (Shilpa Shetty) देखील तिच्या बहिणीला पाठिंबा दिला आहे.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये बाॅलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाची (Neha Dhupia) बिग बाॅसमधील आदलतचा सिन आहे.
ज्यामध्ये शमिताने तिचा बिग बाॅसमधील प्रवास सांगितला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत तु खूप चांगली खेळत असून जे लोक तिला दोगला आणि भावनिक असल्याचं म्हणातात ते बकवास करत असल्याचं शिल्पाने म्हटलं आहे.
एवढंच नाही तर जर शमिता दोगली असती तर तिने एवढ्या चांगल्या रित्या खेळूच शकली नसती,
असं देखील शिल्पाने यामध्ये म्हटलं आहे.

व्हिडीओमध्ये शमिताने स्वतः ती भावनिक असल्याचं सांगितलं आहे.
तर अनेकांनी शमितला फेक म्हटलं आहे. याबाबत देखील शिल्पाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
यावेळी शमिता जशी आहे तशीच ती बिग बाॅसमध्ये दिसत असल्याचं शिल्पाने म्हटलं आहे.
एवढंच नाही तर शमिताला अ‍ॅरोगंट (Arrogant) आणि फेक म्हणायला आम्ही श्रीमंत घरात जन्मलो नाहीये.
त्यामुळे नेहमीच मिडल क्लास परिवार असल्याने आम्हाला आमचा सम्मान नेहमीच महत्त्वाचा आङे, असं शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) म्हटलं आहे.

Web Title :- Shilpa Shetty | bigg boss 15 shilpa shetty angry at those who trolled shamita shetty gave a befitting reply saying we were not born rich

हे देखील वाचा :

नोकरी गेल्याने प्रभावित होऊ शकतो तुमचा Credit Score, एक्सपर्ट सांगतात या 5 गोष्टींची घ्यावी काळजी

Ajit Pawar | अजित पवारांनी केलं महिलांचं कोतुक ! महिला पायलटचा ‘तो’ किस्सा सांगितला…

Maratha Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख

Related Posts