IMPIMP

Shivsena Leader Tanaji Patil | सांगलीतील शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी; ईडीमध्ये तक्रार दाखल

by nagesh
Shivsena Leader Tanaji Patil | complaint to ed against shiv sena leader tanaji patal in sangli

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन- Shivsena Leader Tanaji Patil | आटपाडी तालुक्यातील शिवसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील आणि त्यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना पदाचा गैरवापर करून 1 हजार ७० एकर जमीन संपादित केल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबाची चौकशी करण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाकडे मच्छिंद्र माळी यांनी केली आहे. मच्छिंद्र माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तानाजी पाटील आणि त्यांची पत्नी मनीषा पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या पदाचा गैरवापर करत चुकीच्या मार्गाने त्यांच्या, मुलाच्या आणि भाऊ व भावजय यांच्या नावे नवी मालमत्ता विकत घेतली. (Shivsena Leader Tanaji Patil)

 

मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरांमधून स्थावर मालमत्ता घेत त्यामध्ये गुंतवणूक तानाजी पाटील यांनी केली आहे. तसेच, पदाचा गैरवापर करून आटपाडी तालुक्यातील दिघंची, करगणी, आटपाडी, पुजारवाडी, शेरेवाडी, मुढेवाडी, विठ्ठलापूर, मापटेमळा, खरसुंडी यासह वासुद (ता. सांगोला) याठिकाणी एकूण १०७० एकर जमीन मिळविली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्याशिवाय, दोन पेट्रोल पंप, विविध बँकांमधून मुदत ठेवीची गुंतवणूक, पुणे व मुंबई येथे सदनिका व मोकळे भूखंड खरेदी केले आहेत.
मनी लॉन्ड्री अधिनियमाचे उल्लंघन करून त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी काढून घेतल्या आहेत.
त्या संबंधितांनी स्थानिक पोलिसांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या. आता याबाबत ईडीने चौकशी करावी, अशी मागणी माळी यांनी केली आहे.

 

Web Title :- Shivsena Leader Tanaji Patil | complaint to ed against shiv sena leader tanaji patal in sangli

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गर्भपात करण्यासाठी दिली 24 तुकडे करण्याची धमकी; वाकड मधील धक्कादायक प्रकार

Kidney Care | वृद्धत्वापर्यंत किडनी ठेवायची असेल हेल्दी? ‘या’ 5 चांगल्या सवयींचा करा समावेश

Janhvi Kapoor Fitness | समोर आले जान्हवी कपूरच्या फिटनेसचे रहस्य, कशी बनली Chubby ते Curvy Baby?

 

Related Posts