IMPIMP

Pune Pimpri Crime | लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गर्भपात करण्यासाठी दिली 24 तुकडे करण्याची धमकी; वाकड मधील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Crime News | A woman who came for treatment in Pune was raped at gunpoint

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून तरुणी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर तिला गर्भपात (Abortion Case) कर अन्यथा 24 तुकडे करण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार वाकड परिसरात घडला आहे. याप्रकरणी एकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) ऑगस्ट 2021 ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत रहाटणी आणि पुण्यात घडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी 19 वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) सोमवारी (दि.12) फिर्याद (FIR) दिली आहे. पोलिसांनी मिलिंद वाघमारे उर्फ लखन Milind Waghmare alias Lakhan (रा. थेरगाव) याच्यावर आयपीसी 376, 376 (2) (एन), 313, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीसोबत ओळख करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून तरुणी गरोदर राहिली. तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने गर्भपात केला तर लग्न करेन अन्यथा लग्न करणार नाही असे सांगितले. आरोपीने पीडित तरुणीला एका हॉस्पिटलमध्ये नेऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात केला.

 

दरम्यान, तरुणीचे लग्न जमले. आरोपीने तिला धमकावून लग्न मोडण्यास भाग पाडले.
त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
तरुणी पुन्हा गरोदर राहिल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार देत गर्भपात करण्यास सांगितले.
गर्भपात केला नाहीतर ट्रेन खाली ढकलून देण्याची धमकी दिली.
तसेच 24 तुकडे करुन जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Raped a young woman by luring her to marry, threatened to cut her into 24 pieces for abortion; Shocking type in wakad

 

हे देखील वाचा :

Kidney Care | वृद्धत्वापर्यंत किडनी ठेवायची असेल हेल्दी? ‘या’ 5 चांगल्या सवयींचा करा समावेश

Janhvi Kapoor Fitness | समोर आले जान्हवी कपूरच्या फिटनेसचे रहस्य, कशी बनली Chubby ते Curvy Baby?

Garlic Benefits | हिवाळ्यात रोज करा लसणाचे सेवन; एकाचवेळी नष्ट होतील 11 रोग

 

Related Posts