IMPIMP

Sinhagad Road Flyover | सिंहगड रोड अन् कात्रज येथील उड्डाणपुलांबाबत नितीन गडकरींनी केलेली सुचना ‘वास्तवात’ येण्याची शक्यता अगदीच धूसर

by nagesh
Aurangabad - Pune Expressway Project | Union Minister of Roads and Transport nitin gadkari announces aurangabad to pune express highway project

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Sinhagad Road Flyover | दोनच महिन्यांपुर्वी शहरातील दोन उड्डाणपुलांच्या कामांच्या भुमिपूजनावेळी भविष्याचा विचार करता हे दोन्ही उड्डाणपुल दुमजली करावेत, अशी सूचना करणार्‍या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. त्यांची सूचना ‘वास्तवात’ येण्याची शक्यता अगदीच धूसर झाली आहे. भूसंपादनातील अडथळयांमुळे कात्रज – कोंढवा रस्त्याचा (Katraj-Kondhwa Road) विस्तारीकरणाचा प्रकल्प महापालिकेने (Pune Corporation) तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असून सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road Flyover) राजाराम पूल ते फनटाईम पर्यंतचा पूल (rajaram bridge to funtime flyover) देखिल ‘तांत्रिक’ कारणास्तव दुमजली करणे अवघड असल्याचा निर्वाळा महापालिका अधिकार्‍यांनी (PMC Officers) दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सुचवलेला पर्याय आता येथे राबवला जाणार नाही. राजाराम पूल ते फन टाइम थिएटर पर्यंत उड्डाणपूलासाठी ११८ कोटी रुपये खर्च लागणार आहे. मात्र, याऐवजी मलेशियन तंत्रज्ञान वापरून या रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारता येईल. त्यात मेट्रोसाठीचे (Pune Metro) नियोजन करणे शक्य आहे. या तंत्रज्ञानामुळे पिलरची संख्या कमी होईल. हे काम ११८ कोटी मध्येच होईल, खर्च वाढणार नाही, याचा विचार करा. असं गडकरी यांनी म्हटलं होतं. मात्र, सुचवलेला पर्याय आता येथे राबवला जाणार नाही. हे स्पष्ट होत आहे.

 

दरम्यान कात्रज- कोंढवा रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम भूसंपादनामुळे रेंगाळले आहे.
या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून सातत्याने अपघात होत असल्याने सद्यस्थितीत आहे
त्या रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि येवलेवाडी कडे जाणार्‍या तसेच शेळकेवस्तीकडे जाणार्‍या सर्व्हीस रस्त्याचे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
त्यामुळे हा कात्रज कोंढवा रस्ता अगदी मंतरवाडीपर्यंत दुमजली करावा,
ही गडकरी यांनी कात्रज उड्डाणपुलाच्या (Katraj Flyover) भुमिपूजनाच्यावेळी केलेली सूचना देखिल तूर्तास बाजूला पडल्याचे चित्र आहे. (Sinhagad Road Flyover)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Sinhagad Road Flyover | Nitin Gadkari’s suggestion regarding flyovers at Sinhagad Road and katraj is unlikely to come true

 

हे देखील वाचा :

Smriti Mandhana | स्मृती मंधानाने रचला इतिहास ! BBL मध्ये शतक करणारी ठरली पहिली भारतीय, 64 बॉलमध्ये नाबाद 114 रन

Anti Corruption Bureau Pune | 10 हजारांची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; बारामती तालुक्यातील घटना

Urmila Arjunwadkar | अभिमानास्पद ! जयसिंगपूरची कन्या झाली अमेरिकेत नगरसेविका

 

Related Posts