IMPIMP

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम

by nagesh
SSC HSC Board Exams | hsc ssc board exam rule changed 2023 major change in 10th 12th exam rules students will not get a center in their own school extra time also ends

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. या महामारीमुळे प्रत्येकाचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे नुकसान झाले. शाळा बंद असल्याकारणाने मुलांना शिकताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे अजून जास्तच नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या (SSC HSC Board Exams) परीक्षेत काही महत्त्वाचे बदल केले. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या होम सेंटर्सची म्हणजेच ते शिकत असलेल्या शाळेतच परीक्षेची सुविधा आणि 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.

 

परंतु, आता कोरोनाचा फार मोठा धोका नसल्यामुळे, हा नियम परत घेत असल्याची माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. ऑनलाइन वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या, त्यामुळे त्यांना भरपाईसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी होम सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली होती. या सवलती टाकल्यानंतर आता आगामी बोर्ड परीक्षांसाठी (SSC HSC Board Exams) विद्यार्थ्यांना नेमलेल्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार आहे. तसेच परीक्षेसाठी कोणताही अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यंदाच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा (SSC HSC Board Exams) पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च
महिन्यांत होतील. शिवाय, या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाले आहे.
असे असताना बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. आता परीक्षेला कोरोनापूर्व नियमावली लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात जाणाऱ्या दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च
२०२३ च्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला,
तर दहावीची परीक्षा २ मार्चला सुरू होईल.

 

तपशील : लेखी परीक्षेचा कालावधी बारावी (सर्वसाधारण व द्विलक्षी) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम :
२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३
दहावी : २ मार्च ते २५ मार्च

 

Web Title :- SSC HSC Board Exams | hsc ssc board exam rule changed 2023 major change in 10th 12th exam rules students will not get a center in their own school extra time also ends

 

हे देखील वाचा :

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कोयत्याने वार; धनकवडी परिसरातील घटना

Maharashtra Police Inspector to ACP Promotion | राज्यातील 32 पोलीस निरीक्षक सहायक पोलीस आयुक्त पदाच्या पदोन्नतीच्या कक्षेत; पुणे शहरातील 2, पुणे ग्रामीणमधील 2 आणि अ‍ॅन्टी करप्शनमधील एका अधिकार्‍याचा समावेश, वाचा संपुर्ण यादी

Pune Congress | ‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल – सतेज पाटील

 

Related Posts