IMPIMP

ST Workers Strike | पुण्यात ‘लाल परी’ला लागला ब्रेक ! विभागातील ST ची सर्व वाहतूक ठप्प; दिवाळीनंतर परत गावी जाणार्‍यांचे हाल सुरु

by nagesh
ST Bus travelling stop in Pune! All ST workers on strike

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | विदर्भात सुरु असलेल्या एस टी कामगारांच्या संपाचे (ST Workers Strike) लोण पुणे जिल्ह्यातही पसरले असून सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये संप सुरु झाला आहे. त्यामुळे रात्री निवासी आलेल्या गाड्या वगळता आज लाल परीची चाके पूर्णपणे थांबली आहेत.

दिवाळीच्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारपासून शासकीय तसेच खासगी कार्यालये सुरु झाली आहेत. मात्र, दिवाळी सुट्टीसाठी गावी गेलेल्यांना परत येण्यासाठी एस टी गाड्या उपलब्ध झाल्या नाहीत. विदर्भ, मराठवाड्यात दिवाळीतही एस टी कर्मचार्‍यांचा संप सुरु होता. पुणे (Pune) जिल्ह्यात १३ आगार असून त्यापैकी रविवारी तीन आगार बंद झाले होते. सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये संप सुरु झाला आहे. फक्त रात्री मुक्कामी आलेल्या गाड्या आज सकाळी त्यांच्या डेपोमध्ये परत गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व एस टी स्थानकातील बस वाहतूक बंद झाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पुणे शहरातून जिल्ह्यातील (Pune ST Workers Strike) जवळच्या गावांना जाण्यासाठी एस टी बसशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नाही.
त्यामुळे या गावांमध्ये वेगवेगळ्या कामासाठी तसेच कामावर जाणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे हाल झाले आहेत.
बाहेरगावाहून आलेल्या शेकडो लोकांना नेहमीपेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागले आहेत.
त्याचा मोठा फटका सामान्यांना बसला आहे.

एस टी संपाबाबत मुंबईत आज न्यायालय (Mumbai High Court) सुरु आहे.
यामध्ये काय निर्णय होतो, सरकार (Maharashtra Government) काय म्हणणे मांडते यावर या संपाचा निर्णय होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील एस टीची वाहतूक ठप्प झाली आहे.

 

Web Title: ST Bus travelling stop in Pune! All ST workers on strike

 

हे देखील वाचा :

Pune News | कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या दिवाळी फराळ स्पर्धेत पाचोरकर, नलावडे विजयी

Credit Card | …म्हणून भारतीय लोक क्रेडिट कार्डचा जास्त वापर करतात, ‘विक्रमी’ स्तरावर पोहचला ‘खर्च’; जाणून घ्या

LPG Cylinder Price | तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील 1000 रुपये ! जाणून घ्या मोदी सरकारची योजना?

 

Related Posts