IMPIMP

ST Workers Strike | दुर्देवी ! निलंबनाच्या भीतीने विष प्राशन केलेल्या संपकरी 29 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू

by nagesh
ST Workers Strike | an employee at the pune shivajinagar depot suffered a heart attack after receiving a termination letter incident happen in jalgaon also

बुलढाणा :  सरकारसत्ता ऑनलाइन ST Workers Strike | इतर एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपलेही निलंबन होईल या भीतीने विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा (ST Workers Strike) अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशाल अंबळकर Vishal Ambalkar (29, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे त्याचे नाव आहे. खामगाव आगारातील सहाय्यक तांत्रिक पदावर ते कार्यरत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

गेल्या काही दिवसापासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. अद्यापही तोडगा न निघाल्याने कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. सरकारने निलंबनाचा इशारा दिला असून त्या भीतीनेच माटरगाव येथील रहिवासी विशाल अंबळकर यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती बिघडल्यामुळे अकोला येथे नेह्ण्यात आले. मात्र, मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली.

मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी (ST Workers Strike) ठाम आहेत. तर दुसरीकडे परिवहन महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहून एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा अशी एक विनंती यापुर्वीच केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पत्रात पुढे म्हंटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर तोडगा काढावा. गेल्या ५ दिवसापासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers Strike ) आंदोलन सुरू आहे. परंतु त्याची सरकार दरबारी योग्य दाखल घेतली जात नाही. आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत. दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आपण याही प्रकरणात लक्ष घालावे तसे झाले तर हा प्रश्न सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अन्य कोणत्याही कर्मचाऱ्याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मुख्य मागणीची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षाही वाघ यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

दरम्यान, 29 वर्षीय विशाल अंबळकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने संपकरी एसटी कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कर्मचारी आता त्यांच्या मागण्या पुर्ण झाल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही असं बोलून दाखवत आहेत.
एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
दुसरीकडे एसटी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
अनेक दिवसांपासुन संप सुरू असल्याने नेहमी एसटी बसने प्रवास करणार्‍यांचे हाल होत असताना दिसून येत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- ST Workers Strike | death of poisoned st technician Vishal Ambalkar excitement in khamgaon contact staff angry MSRTC

हे देखील वाचा :

Sugar Factories Of BJP Leaders | थकबाकीमुळे बहुसंख्य भाजप नेतेमंडळींचे साखर कारखाने अजूनही बंद; 237 कोटी 35 लाख रुपयांची थकबाकी

ICC Under-19 Cricket World Cup | …म्हणून न्यूझीलंडची पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार; NZ ऐवजी ‘ही’ टीम सहभागी होणार

Pune Crime | 25 लाखांच्या लॉटरीसाठी गमावले 46 लाख ! सायबर चोरट्यांनी घातला तरुणाला गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना

Related Posts