IMPIMP

Sugar Factories Of BJP Leaders | थकबाकीमुळे बहुसंख्य भाजप नेतेमंडळींचे साखर कारखाने अजूनही बंद; 237 कोटी 35 लाख रुपयांची थकबाकी

by nagesh
sugar-factories-of-bjp-leaders-sugar-factories-majority-bjp-leaders-are-still-closed-harshvardhan-patil-radhakrishna-vikhe-babanrao-pachpute-raosaheb-danve-pankaja-munde

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sugar Factories Of BJP Leaders | गाळप हंगाम सुरु होऊन महिना झाला तरी राज्यातील अनेक साखर कारखाने अद्यापही सुरु नाहीत. ज्या कारखान्यांची थकबाकी आहे अशा कारखान्यांचा गाळपाचा परवाना साखर आयुक्तालयाने रोखून ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक कारखाने हे भाजप नेत्यांचे (Sugar Factories Of BJP Leaders) असून यातील काही कारखाने खासगी आहेत तर काही सहकारी आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve), राज्यातील माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe), बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडे तब्बल २३७ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जालनामधील रामेश्वर कारखाना हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा असून तो सध्या बंद आहे. त्यांच्याकडे २ कोटी ७४ लाख रुपये थकबाकी आहे.
तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अहमदनगरमधील साईकृपा कारखान्याकडे २७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
तर राहुरीतील राधाकृष्ण विखे यांच्या डॉ. बाबूराव तनपुरे कारखान्याकडेही १४ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने तोही कारखाना बंद आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले बैद्यनाथ, नांदेडमधील पन्नगेश्वर हे दोन कारखाने अनुक्रमे ४ कोटी, ६ कोटी रुपये थकबाकी असल्याने बंद आहेत.
मात्र त्यांच्या अंबाजोगाई कारखान्याची कोणतीही थकबाकी नाही.

परंतु, त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने हा कारखाना ही बंद आहे.
इंदापूर कारखाना व सोलापूरमधील इंद्रेश्वर हे दोन्ही कारखाने हर्षवर्धन पाटील यांचे असून अनुक्रमे १२ कोटी ५० लाख व १० कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी असल्याने या कारखान्यांची गाळपाची परवानगी त्यामुळे प्रलंबित आहे.
रणजित मोहिते यांचा सोलापूरमधील शंकर कारखाना ३० कोटी ७६ लाखांच्या थकबाकीमुळे बंद आहे.
मदन पाटील यांचे किसनवीर भुईज व किसनवीर खंडाळा या दोन्ही कारखान्यांकडे अनुक्रमे ५५ कोटी ९१ लाख व १७ कोटी रुपये थकीत असल्याने ते बंद आहेत. (Sugar Factories Of BJP Leaders)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

‘शुगर बेल्ट’मधील कारखान्यांचाही समावेश

शेतकऱ्यांची थकबाकी ठेवल्याने ‘शुगर बेल्ट’मधील काही कारखान्यांना गाळपाचे परवानगी देण्यात आली नाही.
यामध्ये तासगाव सांगली (थकीत २.९४ कोटी ), यशवंत खानापूर (९.८), विश्वास कोल्हापूर (३.७३), टोकाई नांदेड(१०.००), साईबाबा नांदेड(३.३०),
मकाई सोलापूर(६.३४), मातोश्री लक्ष्मी सोलापूर(५.००), आयन मल्टिट्रेड सोलापूर (३.०१) यांचा समावेश आहे.
दरम्यान, औरंगाबादच्या सिद्धेश्वर कारखान्याने थकबाकी नसल्याची कागदपत्रे सादर न केल्याने त्याचा परवानगी प्रलंबित आहे.

 

हे देखील वाचा :

ICC Under-19 Cricket World Cup | …म्हणून न्यूझीलंडची पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार; NZ ऐवजी ‘ही’ टीम सहभागी होणार

Pune Crime | 25 लाखांच्या लॉटरीसाठी गमावले 46 लाख ! सायबर चोरट्यांनी घातला तरुणाला गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना

ICC Under-19 Cricket World Cup | …म्हणून न्यूझीलंडची पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार; NZ ऐवजी ‘ही’ टीम सहभागी होणार

Pune Crime | 25 लाखांच्या लॉटरीसाठी गमावले 46 लाख ! सायबर चोरट्यांनी घातला तरुणाला गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना

ODI World Cup | आयसीसीचा मोठा निर्णय ! वनडे वर्ल्डकप आता अधिक रोमांचक होणार, जाणून घ्या नेमकं काय होणार

 

Related Posts