IMPIMP

Stress Relief Tips | जर तुम्ही सुद्धा असाल Stress ने त्रस्त, तर ‘या’ 3 टिप्स करतील मन शांत

by nagesh
Stress Relief Tips | stress relief tips and how to relieve stress

सरकारसत्ता ऑनलाइन – Stress Relief Tips | असे म्हणतात की, चिंता ही चितेसारखी असते. हे वाक्य सर्वांनी ऐकले असेल. पण आजही बहुतांश लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. तणाव आपल्याला आतून खच्ची करू शकतो आणि तो इतका धोकादायक असू शकतो की त्यामुळे नैराश्य येऊ शकते. तर भारतात, असे मानले जाते की मानसिक आजार हा केवळ एक भास आहे. त्याच वेळी, अनेक लोक असेही मानतात की तणाव केवळ बाह्य कारणांमुळे येतो. (Stress Relief Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पण घरातील तणावाचे काय? होय, अनेकदा घरातून तणावाला सुरूवात होते. हा ताण इतका वाढतो की त्यामुळे राग, चिडचिड, मानसिक त्रास किंवा नैराश्यही येते. यासाठी काही टिप्स जाणून घेवूयात ज्याचा अवलंब करून तुम्ही तणावापासून मुक्ती मिळवू शकता.

 

या कारणांमुळे घरात येऊ शकतो तणाव –
घरामध्ये तणावाची सुरुवात होण्याची अनेक कारणे असू शकतात. घरच्या कामात साथ मिळत नाही, कामाला महत्त्व नाही, काम करत राहा इ. याशिवाय, काहीवेळा घरातील ताण आर्थिक बाबींशी संबंधित असतो. (Stress Relief Tips)

तणाव कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा-

 

1. कुटुंबासोबत घालवा वेळ
कुटुंबासोबत वेळ घालवण्याची सवय लावावी. तुम्ही कितीही व्यस्त असलात, तरी कुटुंबातील सदस्यांसोबत बसण्यासाठी थोडा वेळ काढा. हळूहळू तुम्हाला दिसेल की तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवून अधिक मोकळेपणाने बोलायला शिकला आहात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. स्वतःलाही वेळ द्या
तुम्ही इतर लोकांसोबत वेळ घालवा पण स्वतःसाठीही वेळ काढणे फार महत्वाचे आहे, जरी तुम्ही घरी 15 मिनिटे काढू शकलात तरी चालू शकतील.
या काळात तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता.

 

3. तब्येत ढासळू देऊ नका
तुम्ही चांगले खा, योग्य खा, व्यायाम (Exercise) वेळेवर करा. अगदी थोडे चालले तरी चालेल.
माईंड रिलॅक्स करण्यासाठी घरातील काम एक्सरसाईज म्हणून करा.

 

Web Title :- Stress Relief Tips | stress relief tips and how to relieve stress

 

हे देखील वाचा :

Sunny Leone-Online Crime | सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक,काढलं ‘इतक्या’ हजारांचं कर्ज !

Gold Rate Increase | सोन्याला पुन्हा झळाळी ! एक वर्षानंतर सोन्याचे दर पुन्हा 50 हजार पार, सोने महागण्याची ‘ही’ आहेत दोन कारणं, जाणून घ्या

Pune Crime | फ्रेंडशिप क्लबच्या नावाने उच्चभ्रु महिलांना ‘सेक्स’साठी पुरविण्याचे आमिष दाखवून 60 लाखांना गंडा घालणारा मुख्य सुत्रधार जेरबंद

 

Related Posts