IMPIMP

Pune Crime | फ्रेंडशिप क्लबच्या नावाने उच्चभ्रु महिलांना ‘सेक्स’साठी पुरविण्याचे आमिष दाखवून 60 लाखांना गंडा घालणारा मुख्य सुत्रधार जेरबंद

by nagesh
Aurangabad Crime | 15 lakh robbery in pagariya auto inter state robs gang arrested aurangabad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | फ्रेंडशिप क्लबच्या (Friendship Club) नावाने उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे आमिष दाखवून एका ७६ वर्षाच्या व्यावसायिकाला ६० लाख रुपयांना गंडा (Fraud Case) घालणारा मुख्य सुत्रधाराला सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक केली आहे (Cyber Crime). महिलांना नोकरी देण्याचे आमिष (Cheating Case) दाखवून त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर सीम कार्ड (Sim Card) घेतले व त्या महिलांना बँक खाते (Bank Account) उघडण्यास लावून त्याचा तो वापर करीत असल्याचे तपासात आढळून आले आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अनुप सुकलाल मनोरे Anup Suklal Manore (वय ३५, रा. न्याती, ईवारा, कोरिएंथन क्लबजवळ, मोहम्मदवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने लोकांची फसवणूक करण्याकरिता गणेश शेलार (Ganesh Shelar) असे बनावट नाव धारण केले होते.

 

याप्रकरणी एका व्यावसायिकाने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
त्यांनी मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब नावाची जाहिरात पाहून संपर्क केला.
त्यात त्यांना क्लब हा श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
त्यांची श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातीला २ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले (Pune Crime).
त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली.
सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार मिळाल्यावर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार तिचा शोध घेऊन दिपाली कैलास शिंदे हिला अटक करण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिंदे ही उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे लोकांना फोनद्वारे सांगण्याचे काम करीत होती व गुन्ह्यामधील रक्कम घेण्यासाठी स्वत:चे बँक अकाऊंटचा वापर केला आहे.
शिंदे हिच्या मार्फत हा सर्व कट रचणार्‍या मुख्य आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला.
त्यात अनुप मनोरे हा हे सर्व करीत असल्याचे आढळून आले.
त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) , सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके (Senior Police Inspector D.S. Hake)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगिता माळी (Police Inspector Sangeeta Mali),
उपनिरीक्षक सागर पडवळ (PSI Sagar Padwal), हवालदार असलम आत्तार, राहुल हंडाळ, अंकिता राघो, शिरीष गावडे यांनी ही कारवाई केली.
अशा प्रकारे सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | highprofile women for enjoyment in the name of friendship club Fraud Case Pune Cyber Police Arrest Anup Suklal Manore

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भारत – वेस्ट इंडिज टी-20 सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या 6 जणांना पुणे पोलिसांकडून अटक, 7 लाखाचा मुद्देमाल जप्त

Vitamin D : ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ 6 फूड्सचा आहारात करा समावेश

Health Tips | महिलांनी आरोग्याबाबत कधीही करू नयेत ‘या’ चूका, आजारांपासून रहाल दूर

Nandurbar Police | मद्यापान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाईसह परवाना रद्द, नंदुरबार पोलिसांची विशेष मोहीम

 

Related Posts