IMPIMP

Gold Rate Increase | सोन्याला पुन्हा झळाळी ! एक वर्षानंतर सोन्याचे दर पुन्हा 50 हजार पार, सोने महागण्याची ‘ही’ आहेत दोन कारणं, जाणून घ्या

by nagesh
SGB Scheme | sovereign gold bond scheme open from 19 december know details

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगभरात वाढती महागाई आणि शेअर बाजारातील (Stock Market) उतार – चढाव यामुळे सोन्याला पुन्हा एकदा झळाळी (Gold Rate Increase) आली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ (Gold Rate Increase) होत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 50,400 रुपयांवर गेलं आहे. हा दर मागील एक वर्षाहून अधिक काळातील सर्वोच्च आहे. एक्सचेंजनुसार, सोन्याचा वायदे भाव जानेवारी 2021 नंतर सर्वाधिक झाला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी एक्सचेंजवरही सोन्याचे दर (Gold Rate Increase) 1900 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहेत. मागील वर्षी जून 2021 मध्ये हा दर होता. 2022 मध्ये आतापर्यंत सोनं 3.6 टक्के महागले आहे. ही वाढ 2020 नंतरची सर्वााधिक वाढ आहे. त्यावेळी कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सोनं रेकॉर्ड 2100 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचलं होतं.

 

सोनं महागण्याची 2 प्रमुख कारणे

1. पहिलं कारण म्हणजे जगभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे आहे. तर अमेरिकेत (United States) हा किरकोळ महागाईचा दर 40 वर्षांच्या रेकॉर्ड स्तरावर आहे.

2. रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) दरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. या दोन देशांमधील तणाव एवढा वाढला आहे की, आता युद्धाची परिस्थिती (Situation of War) निर्माण झाली आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करु शकतो असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. (Gold Rate Increase)

 

जाणकारांचे काय आहे मत ?
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याचा दर वाढत असल्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारातही पाहायला मिळत आहे.
लवकरच स्पॉट किमती 50 हजारांचा टप्पा ओलांडू शकतात.
जागतिक बाजारपेठेत सोन्याची अंदाजे किंमत 1920 डॉलर ते 1930 डॉलर दरम्यान असू शकते.
जोखिम वाढल्यास हा दर 1970 प्रति औसपर्यंत जाऊ शकतो. याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळू शकतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात.
8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

 

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

 

Web Title :- Gold Rate Increase | gold rate increase 50000 after one year check main two reasons behind rising prices

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फ्रेंडशिप क्लबच्या नावाने उच्चभ्रु महिलांना ‘सेक्स’साठी पुरविण्याचे आमिष दाखवून 60 लाखांना गंडा घालणारा मुख्य सुत्रधार जेरबंद

Pune Crime | भारत – वेस्ट इंडिज टी-20 सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या 6 जणांना पुणे पोलिसांकडून अटक, 7 लाखाचा मुद्देमाल जप्त

Vitamin D : ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ 6 फूड्सचा आहारात करा समावेश

 

Related Posts