IMPIMP

Sujay Vikhe-Patil | नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकारण बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनेचं; खासदार सुजय विखे-पाटील यांचा खळबळजनक दावा

by nagesh
 Sujay Vikhe-Patil | sujay wikhe patil statement on balasaheb thorat satyajeet tambe and vidhan parishad election congress politics

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sujay Vikhe-Patil | काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik Graduate Constituency) हा खूपच चर्चेत असून यातून वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वतःचा अर्ज न दाखल करता त्यांच्या मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि त्यानंतर काँग्रेस (Congress) पक्षाकडून तांबे पिता-पुत्रांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली. यानंतर या सर्व प्रकरणावर प्रथमच आपले मत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी जे काही घडले त्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान झालेले राजकारण हे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या सहमतीनेच झाले आहे. असा खळबळजनक दावा भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी केला आहे. ते नवी दिल्ली येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

 

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे-पाटील म्हणाले की, ‘ज्यादरम्यान विधानपरिषदेचं राजकारण झालं. त्याच दरम्यान संगमनेरमध्ये काही ठेकेदारांचा मोर्चा निघाला होता. या मोर्चाला बाळासाहेब थोरातांनी मोबाईलवर संबोधित केलं होतं. तेव्हाही ते आजारी होते. मग असं काय झालं की विधानपरिषदेच्या राजकारणावर ते बोलू शकले नाहीत? जर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला असेल तर मग ठेकेदरांना त्यांनी कसं संबोधित केलं? त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी जे राजकारण झालं ते बाळासाहेब थोरातांच्या सहमतीने झालं, हे नाकारात येणार नाही.’ असा दावा यावेळी बोलताना खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर, माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाळासाहेब थोरात हे निष्ठावान नेते आहेत.
असे विधान केले होते. यावर सुजय विखे-पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,
काँग्रेसमधील राजकारणाबाबत बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका यापूर्वीच मांडायला हवी होती.
त्यामुळे त्यांची पक्षावर किती निष्ठा आहे, याबाबत बोलण्यात अर्थ नाही.
यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जिथेही त्यांचे नातेवाईक काँग्रेस विरोधात उभे होते,
तिथे त्यांनी पक्षाला बाजुला सारून नातेवाईकांनाच मदत केली आहे.’ असे देखील सुजय विखे-पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

 

Web Title :- Sujay Vikhe-Patil | sujay wikhe patil statement on balasaheb thorat satyajeet tambe and vidhan parishad election congress politics

 

हे देखील वाचा :

Dhule Crime | धुळे हादरलं! पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करून पतीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

Tagenarine Chanderpaul’s century | तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने रचला इतिहास; पिता- पुत्रांनी ‘या’ यादीमध्ये मिळवले स्थान

Pune Crime News | कोंढव्यात घरात घुसून 54 वर्षीय महिलेचा विनयभंग, पिडीतेच्या मुलांना बेदम मारहाण

 

Related Posts