IMPIMP

Tagenarine Chanderpaul’s century | तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने रचला इतिहास; पिता- पुत्रांनी ‘या’ यादीमध्ये मिळवले स्थान

by nagesh
 Tagenarine Chanderpaul’s century | wi vs zim after tagenarine century he and shivnarine chanderpaul joined the special list of father son pairs

सरकारसत्ता ऑनलाईन  – Tagenarine Chanderpaul’s century | झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारायन चंद्रपॉलने आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. या शतकाबरोबर बाप-लेकांनी वेस्ट-इंडिजकडून खेळताना एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. कारकिर्दीतील पहिले शतक झळकावल्यानंतर तेजनारायण (Tagenarine Chanderpaul’s century) आणि शिवनारायण या पिता- पुत्रांनी खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे तो खास विक्रम?

वेस्ट इंडिजसाठी, कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावणारी ही पहिली पिता-पुत्र जोडी ठरली आहे. त्याचबरोबर असा पराक्रम करणारी ही जगातील १२वी जोडी ठरली आहे.बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात तेजनारायनने यादरम्यान सहकारी फलंदाज क्रेग ब्रॅथवेटसोबत पहिल्या विकेटसाठी २२१ धावांची नाबाद शतकी भागीदारी केली आहे. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या डावातील आतापर्यंत केवळ 89 षटके पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तेजनारायन आणि क्रेग ब्रॅथवेट यांनी विंडीजसाठी शतके झळकावली. तेजनारायण 101 आणि ब्रेथवेट 116 धावांवर नाबाद आहेत. (Tagenarine Chanderpaul’s century )

 

कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पिता-पुत्र जोडी –
1. लाला-मोहिंदर अमरनाथ (भारत)
2. ख्रिस-स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)
3. हनीफ-शोएब मोहम्मद (पाकिस्तान)
4. वॉल्टर-रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड)
5. इफ्तिखार-मंसूर अली खान पतौडी (इंग्लंड, भारत)
6. ज्योफ-शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया)
7. नसर-मुदस्सर (पाकिस्तान)
8. केन-हमिश रुदरफोर्ड (न्यूझीलंड)
9. विजय-संजय मांजरेकर (भारत)
10. डेव्ह-डडली नर्स (दक्षिण आफ्रिका)
11. रॉड-टॉम लाथन (न्यूझीलंड)
12. तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारायन चंद्रपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, काइल मेयर्स, रोस्टन चेस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, केमार रोच.

 

Web Title :-  Tagenarine Chanderpaul’s century | wi vs zim after tagenarine century he and shivnarine chanderpaul joined the special list of father son pairs

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | जाती-धर्माच्या भिंतीपालिकडला ‘आपला माणूस’ रविंद्र धंगेकर यांना काँग्रेस कडून कसबा मतदार संघातून उमेदवारी; महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन करत भरला धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज

Pune Crime News | कोंढव्यात घरात घुसून 54 वर्षीय महिलेचा विनयभंग, पिडीतेच्या मुलांना बेदम मारहाण

Bigg Boss 16 | प्रेक्षकांसमोर डान्स करताना ‘शालीन – अर्चना ‘चा तोल गेला अन्…

 

Related Posts