IMPIMP

Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

by nagesh
Maharashtra Local Body Election | postponement of local self government elections the hearing will be held in three weeks

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Supreme Court On Hawkers | फेरीवाल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक निकाल दिला आहे. फेरीवाल्यांना (Hawkers) ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी रात्री त्यांचे सामान, साहित्य ठेवता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे (Supreme Court On Hawkers). त्याचबरोबर फेरीवाल्यांनी कुठे व्यवसाय करायचा यासंदर्भातील नियम फेरीवाला धोरणानुसार (Hawker Strategy) ठरतील, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे. (Hawkers do not have right to keep their goods and wares at hawking place overnight: Supreme Court)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मार्केटमध्ये एखाद्या फेरीवाल्याला हातगाडीवर व्यवसाय करण्याची परवानगी ही फेरीवाला धोरणानुसार देता येते. पण या जागेवर रात्री सामान आणि साहित्य ठेवण्याचा हक्क सांगता येणार नाही, असं या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. मदनलाल विरुद्ध दिल्ली महापालिका आणि इतर अशा प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह (Justice M. R. Shah) आणि बी. व्ही. नागरथना (Justice B. V. Nagarathana) यांनी हा निकाल दिला आहे.

 

 

सुरुवातीला दिल्ली हाय कोर्टात (Delhi High Court) याचिका दाखल करून आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो, त्याच ठिकाणी रात्री सामान आणि साहित्य ठेवण्याची परवानगी मिळावी आणि तसे आदेश दिल्ली महापालिकेला द्यावेत, अशी मागणी त्या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र, दिल्ली हाय कोर्टाने फेरीवाल्यांचा व्यवसाय फिरत्या स्वरूपाचा व्यवसाय आहे. त्यानुसार त्यांना परवानगी दिली जाते. रात्री साहित्य ठेवण्यासाठी परवानगी देणे हे फिरत्या व्यवसायाच्या स्वरूपाच्या विरोधात जाणार म्हणत ही याचिका फेटाळून लावली होती. या दरम्यान, याचिका कर्त्यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, दिल्ली हाय कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं स्पष्टीकरण देत सर्वोच्च न्यायालयाने देखील ही याचिका फेटाळून लावली आहे.

 

Web Title :- Supreme Court On Hawkers | Hawkers and street vendors do not have the right to keep materials on the streets at night

 

हे देखील वाचा :

Reliance Jio New Plan Launch | बेस्ट ऑफर ! एकही रुपया न देता JioPhone मिळणार मोफत

Corona Virus | देशात पुन्हा कोरोना हातपाय पसरवतोय; ‘या’ राज्यांनी वाढवली चिंता

Sharad Pawar On Devendra Fadnavis | 1993 च्या बॉम्बस्फोटाबाबत फडणवीसांनी केलेल्या आरोपावर शरद पवारांनी केला मोठा खुलासा !

 

Related Posts