IMPIMP

Swiggy-Zomato 1 जुलैपासून डिलिव्हर करणार केवळ ‘क्वालिटी फूड’, FSSAI ग्राहकांच्या हितासाठी लागू करत आहे नवीन नियम

by nagesh
Swiggy-Zomato | fssai asks online food platforms to display of nutritional value from 1 july

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSwiggy-Zomato | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने दर्जेदार खाद्यपदार्थ वितरीत करण्यासाठी ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी पुरवणार्‍या Swiggy-Zomato सारख्या कंपन्यांना कडक सूचना दिल्या आहेत. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन, एफएसएसएआईने 1 जुलैपासून या एग्रीगेटर कंपन्यांना नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एफएसएसएआईनुसार, 1 जुलैपासून, Swiggy-Zomato सारख्या कंपन्यांना हे पहावे लागेल की ते ज्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ डिलिव्हरी करतात त्यांच्यावर वितरण करण्यापूर्वी पोषक तत्वांची संपूर्ण माहिती आहे.

 

सर्व ई – कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्स (FBOs) ला लिहिलेल्या पत्रात, एफएसएसएआईने म्हटले आहे की ते त्यांच्या मोबाईल अ‍ॅपसह सर्व प्लॅटफॉर्मवर अन्नपदार्थांमध्ये असलेल्या कॅलरी, पोषक घटक आणि त्याचे दुष्परिणाम यांच्याशी संबंधित माहिती अनिवार्यपणे प्रदर्शित करतील. असे केल्याने, ग्राहकांना चांगले खाद्यपदार्थ निवडणे सोपे होईल.

 

नवीन लेबलिंग नियम 2020 पासून लागू

एफएसएसएआईने अन्न सेवा आस्थापनांसाठी 2020 मध्ये लेबलिंग आणि आकडे प्रदर्शित करण्यासाठी नियम तयार केले होते. आता ते ई – कॉमर्स फूड कंपन्यांवर लागू केले जात आहे.

प्राधिकरणाने Swiggy-Zomato सारख्या कंपन्यांना त्यांच्या मोबाइल अ‍ॅप्ससह सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पोषणविषयक माहिती प्रदर्शित करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा उद्देश एक म्हणजे दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि दुसरे म्हणजे लोकांना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रादेशिक संचालक करणार प्रकरणांची देखरेख

एफएसएसएआईने त्यांच्या सर्व प्रादेशिक संचालकांना फूड डिलिव्हरी करणार्‍या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

एफएसएसएआईची स्पष्ट सूचना आहे की, 1 जुलै 2022 पासून Display of Information in Food Service Establishments (Labelling and Display) Regulations 2020 चे काटेकोरपणे पालन केले जावे.

या अंतर्गत पोषक तत्वे, त्यात आढळणारे पदार्थ आणि त्यापासून होणारी हानी याची संपूर्ण माहिती प्रदर्शित करणे आवश्यक आहे

 

झोमॅटोने म्हटले – आम्ही पार्टनर्सच्या संपर्कात

ऑनलाइन फूड ऑर्डर घेणारी आणि डिलिव्हरी करणारी आघाडीची कंपनी झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की,
आम्ही आधीच या नियमांचे पालन करत आहोत.
आमच्याशी संबंधित रेस्टॉरंट्स अजूनही स्वेच्छेने अन्नपदार्थांचे पोषणमूल्य आणि हानी याबद्दल माहिती देत आहेत.

आता ही माहिती अनिवार्यपणे शेअर करण्याबाबत आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत आहोत.
या पावलामुळे आमच्या ग्राहकांना सर्व आवश्यक माहिती मिळू शकेल. यावर स्विगीने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

 

Web Title :- Swiggy-Zomato | fssai asks online food platforms to display of nutritional value from 1 july

 

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Election 2022 | ‘…तर विधान परिषदेसाठी एकनाथ खडसेंना मतदान करणार’ – चंद्रकांत पाटील

RBI Governor On Loan Recovery Agent | शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन करतात लोन रिकव्हरी एजंट; आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत RBI

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! बॅंक खात्यात जमा होणार लाखो रुपये; वेतनात वाढ ?

 

Related Posts