IMPIMP

Tech Mahindra Share Price | 40% पर्यंत घसरला ‘या’ दिग्गज कंपनीचा शेअर; एक्सपर्ट म्हणाले – ‘खरेदी करा, नंतर होईल नफा’

by nagesh
Business Ideas | business ideas start your own business with take franchise and earn 80k monthly

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tech Mahindra Share Price | 2022 च्या सुरुवातीपासून टेक महिंद्राचा शेअर विक्रीच्या छायेतून जात आहे. वर्ष ते वर्ष
(YTD) वेळेत, हा IT स्टॉक सुमारे रू. 1784 वरून रू. 1108 च्या पातळीवर घसरला आहे. या कालावधीत, त्यात सुमारे 40 टक्के घट नोंदवली गेली
आहे. (Tech Mahindra Share Price)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

टेक महिंद्राचा शेअर शुक्रवारी 4.21% वाढून 1,124.05 रुपयांवर बंद झाला. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, FII द्वारे मोठ्या प्रमाणात विक्री केल्यानंतर टेक महिंद्राचा शेअर घसरला आहे.

 

बाजार तज्ज्ञांच्या मते, इतर कोणत्याही आयटी कंपनीप्रमाणेच टेक महिंद्रालाही कर्मचार्‍यांचे निर्गमन आणि FII विक्रीचा सामना करावा लागत आहे. (Tech Mahindra Share Price)

 

परदेशी गुंतवणूकदार सातत्याने काढत आहेत पैसे
मार्च 2021 मध्ये टेक महिंद्रामध्ये एफआयआयची होल्डिंग सुमारे 39.5 टक्के होती, जी मार्च 2022 मध्ये जवळपास 34.3 टक्क्यांवर आली आहे.

बाजारातील जाणकारांच्या मते, आयटी शेअरमध्ये आणखी काही घसरण होऊ शकते आणि नंतर तो वर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांना टेक महिंद्राचा शेअर रू. 1,000 ते रू. 1,050 च्या दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

काय आहे टार्गेट प्राईस
टेक महिंद्राच्या शेअरच्या घसरणीमागील कारणांबद्दल बोलताना, प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अविनाश गोरक्षकर म्हणाले, टेक महिंद्राचे शेअर्स तीन मुख्य कारणांमुळे घसरले आहेत –

स्टाफ क्रंच, एफआयआयची विक्री आणि नॅस्डॅकमध्ये सूचीबद्ध आयटी शेअरमध्ये कमजोरी. भारतातील इतर कोणत्याही आयटी कंपनीप्रमाणे, टेक महिंद्राला देखील त्यांच्या कर्मचार्‍यांच्या हाय अट्रिशन रेटचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे त्यांच्या इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाली आहे.

तसेच आर्थिक वर्ष 2022 मध्ये, टेक महिंद्रातील एफआयआयची हिस्सेदारी 39.5 टक्क्यांवरून 34.3 टक्क्यांवर आली आहे.

 

टेक महिंद्रा शेअर किंमत आउटलुक
टेक महिंद्राच्या शेअरच्या किमतीच्या दृष्टिकोनाबाबत, SMC ग्लोबलचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक मुदित गोयल म्हणाले, टेक महिंद्राचा स्टॉक चार्ट पॅटर्नवर कमकुवत दिसत आहे आणि नजीकच्या काळात रु. 1,050 च्या पातळीवर जाऊ शकतो.

एव्हीपी – बोनान्झा पोर्टफोलिओमधील तांत्रिक संशोधन, रोहित सिंगरे म्हणाले, रू. 1,000 ते रू. 1,050 ची पातळी ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. त्यामुळे टेक महिंद्राचे शेअर्स धारण करणारे त्यांचा पोर्टफोलिओ आणखी वाढवू शकतात.

नवीन खरेदीदार या क्षेत्रातील त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टेक महिंद्रा जोडू शकतात आणि रू. 950 स्तरावर स्टॉप लॉस ठेवू शकतात. नजीकच्या भविष्यात हा शेअर 10 – 15 टक्क्यांनी वाढू शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tech Mahindra Share Price | tech mahindra share down 40 percent in fy 2022 expert says buy for profit

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | ‘या’ शेअरने दिला जबरदस्त रिटर्न, 2 महिन्यांपेक्षा कमी वेळात 1 लाख झाले 5 लाख

IPS Sudhir Hiremath | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुधीर हिरेमठ यांच्याकडे सोलापूर शहर पोलिस आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार

Solapur Crime | धक्कादायक ! पत्नीला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं; मग साडीने घेतला गळफास

 

Related Posts