IMPIMP

Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…

by nagesh
Tejas Thackeray | uddhav thackeray younger son tejas thackeray political launching shivsainik put poster in girgaum

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना पक्षातील फूटीनंतर अनेक नेते शिवसेना पक्ष सोडून शिंदे गटात दाखल झाले. आता शिवसेनेसोबत मोजकेच आमदार आणि खासदार राहिले असताना पुन्हा एकदा पक्षाला नवी उर्जा देण्याची मोठी जबाबदारी सध्या उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. त्यात शिंदे गटाच्या विरोधात आपल्या वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. (Tejas Thackeray) त्यातच राजकारणात फारसा रस नसलेले उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे  (Tejas Thackeray) यांच्या राजकीय प्रवेशाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील गिरगावात शिवसैनिकांनी लावलेले पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गिरगावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एक पोस्टर लावण्यात आले आहे. त्यात ‘तेजस उद्धव साहेब ठाकरे’ असे लिहिले असून त्यापुढे ‘आजची शांतता…उद्याचे वादळ…नाव लक्षात ठेवा तेजस उद्धवसाहेब ठाकरे’ अशा प्रकारचा आशय लिहिण्यात आला आहे. त्यामुळे तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी राजकारणात यावे अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे दिसत आहे. तेजस ठाकरेंवर युवासेनेची जबाबदारी देण्यात यावी आधीपासूनच शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.

 

आदित्य ठाकरें प्रमाणे तेजस ठाकरे  (Tejas Thackeray) हे सध्या राजकारणात सक्रिय नसले तरी सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना पक्ष अडचणीत सापडला असताना तेजस ठाकरे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणूकी दरम्यान तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नुकताच महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता. त्यात तेजस ठाकरे समाविष्ट झाले होते.
त्यामुळे आता तेजस ठाकरे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

खरं तर दसरा मेळाव्यादरम्यान तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचे राजकीय लाँचिंग होणार अशा चर्चेने जोर
धरला होता. परंतु एका वृत्तपत्राशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी या सर्व चर्चा खोट्या असल्याचे सांगितले होते.
त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, तेजस हा त्याच्या वाईल्ड लाईफमध्ये बिझी आहे आणि आम्ही आमच्या.

त्यातच आता गिरगाव मध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे तेजस ठाकरे राजकीय मैदानात उतरणार का?
या चर्चांनी पुन्हा वेग पकडला आहे.

 

 

Web Title :- Tejas Thackeray | uddhav thackeray younger son tejas thackeray political launching shivsainik put poster in girgaum

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | हडपसरमधील प्रकाश गोंधळे खून प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या 9 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराकडून 9 कोयते जप्त

Keshav Upadhye On Uddhav Thackeray | घटनाबाह्य रीतीने पद पटकावणाऱ्या ठाकरेंकडून महाराष्ट्राची फसवणूक- केशव उपाध्ये

 

Related Posts